Glenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात "या खेळाडूला कॅप्टन करा"

Glenn  McGrath back david warner as captain: ऑस्ट्रेलियन क्रिकेट समितीने (Australian Cricket Board) नुकतंच आपल्या धोरणात बदल करून डेव्हिड वॉर्नरचा पुन्हा कर्णधारपदाचा (Australian Captain David Warner) मार्ग मोकळा केलाय. 

Updated: Nov 26, 2022, 09:04 PM IST
Glenn McGrath: वर्ल्ड कपमध्ये सुपडा साफ, ग्लेन मॅक्ग्रा म्हणतात "या खेळाडूला कॅप्टन करा" title=
Glenn McGrath, David Warner

Glenn McGrath On David Warner: टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) यजमान ऑस्ट्रेलियाला सुपर 12 मधून बाहेर पडावं लागलं. वर्ल्ड कपमधील लाजीरवाण्या पराभवामुळे ऑस्ट्रेलियन (Cricket Australia) संघावर सर्व स्तरातून टीका होत होती. तर कॅप्टन अरॉन फिंचच्या (Aaron finch) कॅप्टनसीवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. त्यानंतर आता ऑस्ट्रेलियाचे माजी स्टार गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रा (Glenn McGrath) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू तत्कालीन कर्णधार स्टीव्ह स्मिथ, वॉर्नर (David Warner) आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील तिसर्‍या कसोटीत बॉल टेम्परिंग (Ball Tampering) प्रकरणात सहभागी झाल्यामुळे बंदी घालण्यात आली होती. या तिन्ही खेळाडूंवर एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी ऑस्ट्रेलियन क्रिकेटने डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner Captain) कर्णधारपदावर आजीवन बंदी घातली होती. मात्र, आता नेतृत्वाचा प्रश्न उभा राहिलाय.

ऑस्ट्रेलियन क्रिकेट समितीने (Australian Cricket Board) नुकतंच आपल्या धोरणात बदल करून डेव्हिड वॉर्नरचा पुन्हा कर्णधारपदाचा (Australian Captain David Warner) मार्ग मोकळा केलाय. अशा स्थितीत वॉर्नर कर्णधारपदाची संधी मिळण्याचा दावेदार असल्याचं मॅक्ग्रा (Glenn McGrath) यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले ग्लेन मॅक्ग्रा ?

मला वाटतं की ऑस्ट्रेलियाने ज्याप्रकारे परिस्थिती हाताळली, त्यामुळे कोणत्याही फॉरमॅटमध्ये कर्णधार बनण्याचा वॉर्नरचा मार्ग मोकळा झालाय. मला वाटतं की तिन्ही खेळाडूंनी त्यांच्या चुकीची किंमत मोजली आहे. बॉल टॅम्परिंगसाठी त्याने इतर कोणत्याही क्रिकेटरपेक्षा जास्त किंमत मोडली आहे. वॉर्नरला ऑस्ट्रेलियाची कॅप्टनसी देणार असेल तर त्याला माझ्या शुभेच्छा आहेत, असं ग्लेन मॅक्र्गा म्हणाले आहेत.

आणखी वाचा - Ind Vs NZ : हेमिल्टनमध्ये Arshdeep Singh चा भांगड्याने जिंकलं सर्वांचं मन, व्हिडीओ व्हायरल

दरम्यान, घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप सामन्यात पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. डेव्हिड वॉर्नरने (David Warner Stats) आतापर्यंत एकूण 12 सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केलंय. त्यात त्यानं कॅप्टन म्हणून 11 सामने जिंकले आहेत, तर फक्त एका सामन्यात त्याला पराभवाला स्विकारावा लागला.