World Cup 2023 | पाकिस्तानला शिंगावर घेणाऱ्या गौतम गंभीरने गायले बाबर आझमचे गोडवे, कोहलीचं नाव घेत म्हणतो...

ICC ODI world Cup 2023 :  '7 वन्डर्स ऑफ क्रिकेट' यावर बोलताना गौतम गंभीरने बाबर आझमचं गोडवे गायले आहेत.

Updated: Sep 23, 2023, 05:10 PM IST
World Cup 2023 | पाकिस्तानला शिंगावर घेणाऱ्या गौतम गंभीरने गायले बाबर आझमचे गोडवे, कोहलीचं नाव घेत म्हणतो... title=
Gautam Gambhir, Babar Azam

Gautam Gambhir On Babar Azam : आगामी क्रिकेटच्या महाकुंभाला म्हणजेच वर्ल्ड कपला (World Cup 2023) आता फक्त काही दिवस शिल्लक आहेत. वर्ल्ड कपसाठी सर्व संघ मजबूत तयारी करत असल्याचं दिसतायेत. अशातच आता वर्ल्ड कप कोण जिंकणार? आणि कोणता प्लेयर यंदाची बाजी मारणार? यावर अनेक चर्चा सुरू आहेत. अशातच '7 वन्डर्स ऑफ क्रिकेट' यावर बोलताना गौतम गंभीरने बाबर आझमचं गोडवे गायले आहेत.

नेमकं काय म्हणाला गौतम गंभीर?

विराट कोहली, केन विल्यम्सन, स्टिव स्मिथ, बाबर आझम, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, जो रूट या 7 खेळाडूंच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष असेल. तू कोणत्या खेळाडूला निवडशील? ज्याच्या कामगिरी तुला पहायला आवडेल? असा सवाल गौतम गंभीरला विचारला गेला. त्यावर गौतम गंभीर  दोन सेकंद विचार करत उत्तर देतो. 

आणखी वाचा - ना रोहित ना विराट, सुरेश रैना म्हणतो 'वर्ल्ड कपमध्ये 'हा' खेळाडू ठरणार हुकमी एक्का'

गंभीरने 7 सुपरस्टार खेळाडूंपैकी बाबर आझमची निवड केली. बाबर आझमकडे प्रत्येक प्रकारची क्वालिटी आहे. तो यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये आग लावू शकतो. असे खूप कमी असे खेळाडू आहेत, ज्यांच्याकडे खेळण्यासाठी खूप वेळ असतो. नक्कीच विराट कोहली, जो रूट, डेव्हिड वॉर्नर यासारखे खेळाडू नक्कीच चांगले खेळाडू आहेत. मात्र, बाबर आझमकडे एक वेगळी क्वालिटी आहे, असं गौतम गंभीर म्हणतो. 

पाहा Video

दरम्यान, स्टार स्पोर्ट्सच्या 'मिशन वर्ल्डकप' या विशेष कार्यक्रमात बोलताना गौतम गंभीरने बाबर आझमचं कौतुक केलंय. वर्ल्डकप जिंकायचा असेल तर ऑस्ट्रेलियाचा पराभव करावा लागेल. कोणत्याही आयसीसी स्पर्धेत ऑस्ट्रेलिया मजबूत संघ आहे. तुम्ही रँकिंगकडे लक्ष देवू नका, त्याच्याने काही फरक पडत नाही, असं गौतम गंभीर म्हणतो. ऑस्ट्रेलियाकडे ज्याप्रकारचे खेळाडू आहेत ते पाहता पुन्हा ऑस्ट्रेलियाच जिंकेल, अशी भविष्यवाणी शेन वॉट्सन याने केलं होती. त्यामुळे आता टीम इंडियाचं प्रदर्शन कसं असेल? यावर मोठी चर्चा होताना दिसत आहे.