डिविलियर्सच्या नावापुढे असलेल्या एबीचं फुलफॉर्म काय?

काय आहे एबी डिविलियर्सचं पूर्ण नाव...

Updated: May 26, 2018, 03:29 PM IST
डिविलियर्सच्या नावापुढे असलेल्या एबीचं फुलफॉर्म काय? title=

मुंबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपल्या वेगवेगळ्या शॉट्सने क्रिकेटप्रेमींनी हैराण करणार एबी डिविलियर्स क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे. त्याच्या अचानक निवृत्तीने अनेकांना धक्का बसला आहे. सुपरमॅन, मिस्टर कूल आणि मिस्टर 360 अशा वेगवेगळ्या नावांनी प्रसिद्ध असलेला डिविलियर्सचं पूर्ण नाव काय याबाबत अनेकांना उत्सूकता असेल. एबीचं फुलफॉर्म काय याबाबत तुम्हाला माहित नसेल. डिविलियर्स खरं नाव आहे अब्राहम बेंजामिन डिविलियर्स (Abraham Benjamin de Villiers).

क्रिकेटला एका वेगळ्या स्तरावर घेऊन जाणार दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार एबी डिविलियर्सच्या निवृत्तीने अनेक क्रिकेट खेळाडूंना धक्का बसला. त्याच्या निवृत्तीच्या बातमीनंतर अनेकांच्या प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली.  

डिविलियर्सने आयपीएल 2018 मध्ये 6 अर्धशतक केली. 12 सामन्यांमध्ये त्याने एकूण 480 रन केले. आयपीएलच्या संपूर्ण करिअरमध्ये डिविलियर्सने एकूण 141 सामने खेळले. ज्यामध्ये 3 शतक आणि 28 अर्धशतकांच्या मदतीने त्याने 3953 रन केले.