टीम इंडियाच्या माजी बॉलरच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन

चेतन साकरिया, पीयूष चावला पाठोपाठ आणखी एका क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

Updated: May 12, 2021, 05:56 PM IST
टीम इंडियाच्या माजी बॉलरच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन title=

मुंबई: देशात कोरोनाचं थैमान सुरू आहे. क्रिकेट विश्वावरही मोठं संकट आलं आहे. बायो बबलमध्ये कोरोना घुसल्यानं IPL2021चे सामने तात्पुरते स्थगित झाले आहेत. तर दुसरीकडे क्रिडा विश्वातील अनेक खेळाडूंच्या घरात कोरोनानं धडक दिल्याने त्यांच्यावर डोंगर कोसळला आहे. चेतन साकरिया, पीयूष चावला पाठोपाठ आणखी एका क्रिकेटपटूवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 

टीम इंडियाचा माजी खेळाडू आर पी सिंह यांच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झालं. सिंह यांनी ट्वीट करून त्याबद्दल माहिती दिली आहे. याआधी चेतन साकरिया आणि पीयूष चावलाच्या वडिलांचं कोरोनामुळे निधन झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. 

आर अश्विनच्या वडिलांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी झाली होती. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. कोरोनाची लस घेतल्यामुळे त्याचा वडिलांचा जीव वाचू शकला असं अश्विननं सांगितलं आहे. 

भारतातील कोरोना व्हायरसच्या दुसर्‍या लाटेमुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्या आहेत. बेड, औषध आणि ऑक्सिजनचा तुटवडा होत आहे. चार लाखहून अधिक लोकांना 24 तासांत कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती समोर येत आहे.  आवश्यक औषधे आणि ऑक्सिजन नसल्यामुळे हे संकट अधिकच वाढले आहे. यामुळे दररोज हजारो लोक आपला जीव गमावत आहेत.