Ramiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध!

Latest Sports News: पीसीबीच्या (PCB) अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा (Ramiz Raja) यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. 

Updated: Feb 3, 2023, 05:12 PM IST
Ramiz Raja: "टीम इंडियाने पाकिस्तानची नक्कल केली अन्...", पाकिस्तानच्या रमीझ राजा यांचा जावईशोध! title=
Ramiz Raja

Ramiz Raja On Team India: पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे (Pakistan Cricket Board) माजी अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या बोर्डावर ताशेरे ओढले. नवनिर्वाचित अध्यक्ष नजम सेठी (Nazam Sethi) यांच्यावर ते सातत्याने हल्लाबोल करत असल्याचं पहायला मिळतंय. पीसीबीमध्ये (PCB) राजकीय खेळी खेळली असल्याचा आरोप त्यांनी केल्यानंतर रमीझ राजा चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. अशातच आता रमीझ राजा यांनी जावईशोध लावला आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर तुम्हालाही हसावं की संताप व्यक्त करावा? असा प्रश्न तुम्हाला पडेल. (former pakistan cricket board president ramiz raja has claimed that india copied pakistans bowling lineup latest sports news)

काय म्हणाले Ramiz Raja?

मला अनेकदा असं वाटतं की, टीम इंडियाने (Team India) पाकिस्तानची (Pakistan) नक्कल केली. भारताने पाकिस्तानकडे पाहून पाकिस्तानची गोलंदाजी आत्मसात करण्याचा प्रयत्न केलाय. त्यांच्या गोलंदाजीची रचना त्याच पद्धतीने केली गेली.  उमरान मलिककडे  (Umran Malik) हारिस राऊफसारखा (Haris Rauf) वेग आहे, तर भारताकडे अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) रुपात शाहीन आफ्रिदीसारखा (Shaheen Afridi) डावखुरा गोलंदाज आहे, असं रमीझ राजा (Ramiz Raja) बरळले आहेत.

वसीम ज्युनियर (Wasim Jr) मिडल ओव्हरमध्ये विकेट काढण्याचा प्रयत्न करतो तर भारताकडून हार्दिक पांड्या (hardik pandya) ही तिच भूमिका साकारतोय. यासोबतच दोघांचा वेगही सारखाच आहे. शिवम मावी (Shivam Mavi) सहाय्यक गोलंदाजाच्या भूमिकेत आहे. भारत फिरकीमध्ये पाकिस्तानपेक्षा थोडा चांगला आहे. मी जेव्हा जेव्हा दोन्ही बाजूंचा खेळ पाहतो तेव्हा मला नेहमी वाटतं की पाकिस्तानला काय सुधारण्याची गरज आहे, असं म्हणत रमीझ राजा (Ramiz Raja On Team India) यांनी आपल्या बौद्धिक आकलनाचं प्रदर्शन केलंय.

आणखी वाचा-  Chris Gayle : ना हरभजन ना आश्विन... ख्रिस गेल म्हणतो, 'या' खेळाडूने मला त्रास दिला!

दरम्यान, पीसीबीच्या अध्यक्षपदावर विराजमान झाल्यानंतर रमीझ राजा यांनी भारतावर टीका करण्याची कोणतीही संधी सोडली नाही. आमच्या स्वातंत्र्याशी तडजोड केली जाते, कारण आयसीसीची (ICC) बहुतेक संसाधने भारतात तयार केली जातात. जर भारताची मानसिकता पाकिस्तानला (Ind-Pak) मागे टाकण्याची असेल तर आम्ही वेगळा पर्याय निवडू, असं रमीझ राजा म्हणाले होते. त्यानंतर त्यांच्या पीसीबीने त्यांचा काटा काढलाय.