पाकिस्तानी संघाचा माजी क्रिकेटपटू कोरोनाच्या विळख्यात

क्रिकेटविश्वाला देखील कोरोनाची झळ लागली आहे. 

Updated: May 24, 2020, 06:54 PM IST
पाकिस्तानी संघाचा माजी क्रिकेटपटू कोरोनाच्या विळख्यात  title=

मुंबई : पाकिस्तानी क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटपटू तौफिक उमरला करोनाची लागण झाल्याची बातमी समोर येत आहे. एकंदर पाहता हॉलिवूड, बलिवूडनंतर आता क्रिकेटविश्वाला देखील कोरोनाची झळ लागली आहे. या धोकादायक विषाणूची लागण होणारा तौफिक उमर हा पहिला क्रिकेटपटू असल्याचं मानलं जात आहे. कोरोनाची लागण झाल्याचं लक्षात येताच त्याने स्वतःला क्वारंटाइन केलेलं आहे. करोना विषाणूच्या प्रादुर्भावानंतर सध्या जगभरातील क्रिकेट स्पर्धा बंद आहेत.

क्रिकेटपटू तौफिक उमरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. पाकिस्तानी संघाचा महत्वाचा फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. २०१४ साली न्यूझीलंडविरुद्धचा कसोटी सामना हा त्याचा अखेरचा सामना ठरला होता. त्याला कोरोना लागण झाल्याची बातमी कळताच चाहत्यांची चिंता व्यक्त केली आहे. 

सतत होणाऱ्या दुखापतींमुळे तौफिक संघात आपलं स्थान कायम राखू शकला नाही.  २००१ साली बांगलादेशविरुद्ध कसोटी सामन्यात तौफिकने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अखेर  २०१६ रोजी त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली होती. 

कोरोनामुळे जगातल्या बहुतेक देशांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. याचा फटका क्रिकेटलाही बसला आहे. पण आता लॉकडाऊननंतरचं क्रिकेट पूर्णपणे वेगळं असेल. आयसीसीच्या नियमांनुसार खेळाडू त्यांची टोपी, टॉवेल, गॉगल, स्वेटर अंपायरकडे देऊ शकणार नाही, तसंच खेळाडूंनी एकमेकांपासून शारिरिक अंतर ठेवावं. पण खेळाडूंचं सामान कोणाकडे ठेवायचं? हे आयसीसीने सांगितलं नाही. एवढच नाही तर अंपायरनी बॉल पकडताना हातमोजे वापरावेत, अशा सूचनाही आयसीसने केल्या आहेत.