टीम इंडियाच्या खेळाडूची महाराष्ट्राच्या या भागात सरावाला सुरुवात

कोरोना लॉकडाऊनमध्ये सराव सुरू करणारा टीम इंडियाचा पहिला खेळाडू

Updated: May 23, 2020, 07:18 PM IST
टीम इंडियाच्या खेळाडूची महाराष्ट्राच्या या भागात सरावाला सुरुवात title=

पालघर : कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमध्ये सगळ्या क्रिकेट स्पर्धा अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे क्रिकेटपटूही मागचे जवळपास ३ महिने घरातच बसून आहेत. आता मात्र भारताचा फास्ट बॉलर शार्दूल ठाकूरने पालघरमध्ये ट्रेनिंगला सुरुवात केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनने याबाबत माहिती दिली आहे.

पालघरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खेळाबाबत गाईडलाईन्स दिल्या, त्यामुळे सराव सुरू करण्याचं आमचं लक्ष्य पूर्ण होतंय. पालघरमध्ये आमच्या सुविधा उपलब्ध असल्यामुळे खेळाडूंना गरजेचा असलेला सराव सुरू झाला आहे. सरावावेळी सोशल डिस्टन्सिंग आणि स्वच्छतेचे नियम पाळले जात आहेत, असं एमसीएने सांगितलं आहे. 

पालघर हा रेड झोन नसलेला भाग आहे. नॉन रेड झोनमध्ये खेळाला प्रेक्षकांशिवाय परवानगी देण्यात आल्यामुळे शार्दुल ठाकूरने सरावाला सुरुवात केल्याची प्रतिक्रिया एमसीएने दिली आहे. शार्दुल ठाकूर हा पालघरमध्येच राहतो.

कोरोना व्हायरसमुळे भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातली वनडे सीरिज रद्द करण्यात आली. तसंच आयपीएलही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आलं आहे.