अविश्वसनीय! एकही बॉल न टाकता इनिंग घोषित

क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक अविश्वसनीय घटना होतात. अशीच एक घटना न्यूझीलंडच्या घरगुती क्रिकेट स्पर्धा असलेल्या प्लांकट शिल्डमध्ये झाली आहे. एकाच मॅचच्या दोन इनिंगमध्ये एकही विकेट न जाता आणि एकही रन न बनता इनिंग घोषित करण्यात आली. दोन्ही इनिंगमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही.

Updated: Oct 15, 2018, 06:18 PM IST
अविश्वसनीय! एकही बॉल न टाकता इनिंग घोषित title=

नेल्सन : क्रिकेटच्या इतिहासामध्ये अनेक अविश्वसनीय घटना होतात. अशीच एक घटना न्यूझीलंडच्या घरगुती क्रिकेट स्पर्धा असलेल्या प्लांकट शिल्डमध्ये झाली आहे. एकाच मॅचच्या दोन इनिंगमध्ये एकही विकेट न जाता आणि एकही रन न बनता इनिंग घोषित करण्यात आली. दोन्ही इनिंगमध्ये एकही बॉल टाकला गेला नाही.

सेंट्रल डिसट्रिक्ट आणि कँटरबरीमधल्या मॅचमध्ये पावसानं व्यत्यय आणला. अखेर सेंट्रल डिसट्रिक्टनं १४५ रननं विजय मिळवला. पावसामुळे या मॅचमध्ये दोन दिवसांचा खेळ झाला नाही. शेवटच्या दिवशी सेंट्रल डिसट्रिक्टनं ७ विकेट गमावून ३०१ रनवर सुरुवात केली. टीमनं त्यांच्या स्कोअरमध्ये ५१ रन जोडले. दिवसाच्या सातव्या ओव्हरला सेंट्रल डिसट्रिक्टनं ३५२/७ वर इनिंग घोषित केली.

यानंतर कँटरबरीनं त्यांची पहिली इनिंग एकही बॉल न खेळता घोषित केली तर सेंट्रल डिसट्रिक्टनंही त्यांची दुसरी इनिंग अशाच प्रकारे घोषित केली. कँटरबरीची दुसरी इनिंग २०७ रनवर संपली आणि त्यांना ही मॅच गमवावी लागली.

याआधी २ वेळा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये अशा घटना घडल्या आहेत. हॅम्पशायरनं २०१३ सालच्या काऊंटी चॅम्पियनशीपमध्ये ग्लोसेस्टशायर आणि लीसेस्टशायरविरुद्ध असं केलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये फक्त एकदाच २००० साली दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडच्या मॅचमध्ये असं झालं होतं.