VIDEO: पृथ्वी शॉसोबत मैदानात घडली सचिनसारखीच घटना

ेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला. 

Updated: Oct 15, 2018, 04:42 PM IST
VIDEO: पृथ्वी शॉसोबत मैदानात घडली सचिनसारखीच घटना title=

हैदराबाद : वेस्ट इंडिजविरुद्धच्या दोन्ही टेस्ट मॅचमध्ये भारताचा शानदार विजय झाला. घरच्या मैदानामध्ये भारताचा हा लागोपाठ १०वा विजय आहे. हैदराबादमध्ये झालेल्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारतानं वेस्ट इंडिजला १० विकेटनं हरवलं. ओपनर पृथ्वी शॉनं विजयी रन केले तर उमेश यादवनं दुसऱ्या इनिंगमध्ये ४५ रन देऊन ४ विकेट घेतले. याचबरोबर उमेश यादवनं कपील देव आणि जवागल श्रीनाथच्या रेकॉर्डशी बरोबरी केली. भारतात एकाच टेस्टमध्ये १० विकेट घेणारा उमेश यादव कपील देव आणि श्रीनाथनंतर तिसरा भारतीय फास्ट बॉलर बनला आहे.

पृथ्वीसोबत घडली सचिनसारखीच घटना

या टेस्ट मॅचमध्ये पृथ्वी शॉला जेसन होल्डरच्या बॉलिंगवर एलबीडब्ल्यूसाठी अपील करण्यात आलं. पण अंपायर इयन गोल्ड यांनी शॉला नॉट आऊट दिलं. यानंतर वेस्ट इंडिजच्या टीमनं रिव्ह्यू घेतला. या रिव्ह्यूमध्ये बॉल स्टम्पला लागताना दिसत होता पण अंपायर्स कॉल असल्यामुळे शॉला नॉट आऊट देण्यात आलं. यावेळी पृथ्वी शॉ शून्यवर खेळत होता.

जेसन होल्डरनं टाकलेला हा बॉल पृथ्वी शॉच्या दंडाला लागला होता. त्यामुळे यावेळी सचिन तेंडुलकरसोबत १९९९-२००० साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या टेस्ट मॅचची आठवण झाली. अॅडलेडमध्ये पहिल्या टेस्टच्या दुसऱ्या इनिंगमध्ये ग्लेन मॅकग्राच्या बॉलिंगवर सचिनला शून्यवर आऊट देण्यात आलं. त्यावेळीही शॉप्रमाणेच सचिनच्याही दंडालाच बॉल लागला होता. पण अंपायर डॅरेल हार्पर यांनी सचिला आऊट दिलं. डॅरेल हार्पर यांच्यावर या निर्णयानंतर मोठी टीका झाली होती.

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमधून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या पृथ्वी शॉनं शानदार शतक केलं होतं. यानंतर दुसऱ्या टेस्टमध्ये शॉनं पहिल्या इनिंगमध्ये ७० रन आणि दुसऱ्या इनिंगमध्ये नाबाद ३३ रन केले. या कामगिरीबद्दल त्याला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.