Prime Minister Narendra Modi On Football: फीफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचं जेतेपद अर्जेंटिनानं पटकावलं आहे. 36 वर्षानंतर मेस्सीच्या संघानं अर्जेंटिना वर्ल्डकप जिंकून दिला आहे. अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यात रंगलेला सामना पहिल्या 90 मिनिटात 2-2 ने बरोबरीत सुटला. त्यानंतर एक्स्ट्रा टाईममध्ये पुन्हा दोन्ही संघाने प्रत्येकी एक गोल करत 3-3 ने बरोबरी साधली. त्यामुळे सामन्याचा निकाल पेनल्टी शूटआऊटमध्ये गेला आणि अर्जेंटिनाने हा सामना 4-2 ने जिंकला. या विजयासह मेस्सीचा वर्ल्डकप प्रवासाचा शेवटही गोड झाला. यामुळे भारतीय फुटबॉलप्रेमींनी जल्लोष केला आणि अभिनंदनाचा वर्षाव केला. मात्र भारतीय संघ फीफा वर्ल्डकपसारख्या स्पर्धेत पात्र होऊ शकला नसल्याने खंतही व्यक्त केली. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रविवारी मेघालय येथे झालेल्या सभेमध्ये फुटबॉलबाबत मोठी घोषणा केली आहे. भारतात फीफा वर्ल्डकपसारखा (FIFA World Cup) इव्हेंट केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं.
"कतारमध्ये फुटबॉल वर्ल्डकपचा अंतिम सामना रंगला. मी तुम्हाला आश्वासन देऊ इच्छितो की, फीफा वर्ल्डकपसारख्या इव्हेंटचं भारतात आयोजन करू. तसेच भारतीय तिरंगा डौलाने फडकवू.", असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभेला संबोधित करताना सांगितलं. भाजपाच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणाची क्लिप ट्वीट करण्यात आली आहे.
Today the teams playing in the Qatar final is between foreign countries.
But, I can say with assurance that we will be organizing an event like FIFA world cup in India and will cheer for the tricolor.
- PM @narendramodi pic.twitter.com/RsmBNIrHao
— BJP (@BJP4India) December 18, 2022
बातमी वाचा- FIFA World Cup 2026 स्पर्धेत भारताला मिळणार संधी! इतके संघ होणार सहभागी
"खेळाप्रती आम्ही नवी रणनिती आखत आहोत. पूर्वोत्तर राज्यात पहिलं क्रीडा विद्यापीठ उभं रात आहेत. पूर्वोत्तर राज्यांना फुटबॉल ग्राउंड, अॅथलीट ट्रॅक मिळतील.", असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढे सांगितलं.