FIFA World Cup मध्ये आणखी एक मोठा उलटफेर; अर्जेंटीनानंतर Germany चा पराभव

FIFA World Cup 2022: जपानच्या फुटबॉल टीमने जर्मनीसारख्या बलाढ्य टीमचा पराभव केला आहे.

Updated: Nov 23, 2022, 11:21 PM IST
FIFA World Cup मध्ये आणखी एक मोठा उलटफेर; अर्जेंटीनानंतर Germany चा पराभव title=

FIFA World Cup 2022:  फिफा वर्ल्डकप 2022 मध्ये आजच्या सामन्यात पुन्हा मोठा उलटफेर पहायला मिळाला आहे. आज जपानच्या फुटबॉल टीमने जर्मनीसारख्या बलाढ्य टीमचा पराभव केला आहे. 2014 साली वर्ल्डकप जिंकलेल्या जर्मनीचा 2-1 असा पराभव झाला आहे. ritsu doan आणि Takuma Asano या दोघांनी प्रत्येकी 1-1 गोल करत जपानला विजयाच्या वाटेवर नेलं.जर्मनीकडून 33 व्या मिनिटाला एक गोल करण्यात आला, मात्र त्यानंतर संपूर्ण टीम गोल करण्यास अपयशी ठरली. हा जर्मनीचा मोठा पराभव मानला जातोय.

सेकंड हाफमध्ये जर्मनीने जपानवर वर्चस्व दाखवलं जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करत 2 गोल्स केले. सुरुवातीला जर्मन खेळाडू आक्रामक खेळण्याच्या मूडमध्ये दिसत होते. यामध्ये इल्के गुंडोगन 33 व्या मिनिटाला पेनल्टीद्वारे जर्मनीसाठी पहिला गोल केला. 

त्यानंतर दुसरीकडे, जपान गोल करण्यासाठी धडपड करत होता. अखेर सेकंड हाफमध्ये जपानने जोरदार खेळ करत जर्मनीला सामन्यातून बाहेर काढलं. जपानच्या खेळाडूंनी जर्मन खेळाडूंवर चांगलाच दबाव आणला. आणि 2 गोल करत विजय मिळवला.