FIFA World Cup 2022 Quarter Final: फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेचा थरार आता अंतिम टप्प्यात आला आहे. 32 पैकी आठ संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. यामध्ये क्रोएशिया, ब्राझील, नेदरलँड, अर्जेंटिना, मोरोक्को, पोर्तुगाल, इंग्लंड आणि फ्रान्स या संघांनी उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या पैकी अंतिम फेरीत कोण धडक मारणार? ही उत्सुकता क्रीडाप्रेमींना आहे. उपांत्यपूर्व फेरीत क्रोएशिया विरुद्ध ब्राझील, नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना, मोरोक्को विरुद्ध पोर्तुगाल आणि इंग्लंड विरुद्ध फ्रान्स अशी लढत असणार आहे.
उपांत्यपूर्व फेरीत पहिला सामना क्रोएशिया विरुद्ध ब्राझील यांच्यात रंगणार आहे. हा सामना 9 डिसेंबरला संध्याकाळी 8.30 वाजता असणार आहे. या सामन्यात ब्राझीलचं पारडं जड मानलं जातं आहे. साखळी फेरीत ब्राझीलनं तीन पैकी दोन सामने जिंकत सुपर 16 मध्ये धडक मारली. पहिल्या सामन्यात सर्बियाचा 2-0, स्वित्झर्लंडचा 1-0 ने पराभव केला. तर कॅमरुनकडून 1-0 ने पराभव सहन करावा लागला. सुपर 16 फेरीत ब्राझीलनं साउथ कोरियाचा 4-1 ने धुव्वा उडवला आणि उपांत्य फेरीत धडक मारली.
दुसरीकडे, क्रोएशियानं या स्पर्धेत साजेशी कामगिरी केलेली नाही. मोरोक्को आणि बेल्जियमविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. तर कॅनडाविरुद्ध 4-1 सामना जिंकत सुपर 16 मध्ये स्थान मिळवलं. सुपर 16 मध्ये जापानविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. मात्र पेनल्टी शूटआउटमध्ये 1-3 ने विजय मिळवला.
#FIFAWorldCup #Qatar2022 pic.twitter.com/cp8JHJdO03
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 7, 2022
उपांत्यपूर्व फेरीत दुसरा सामना नेदरलँड विरुद्ध अर्जेंटिना यांच्यात रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार 10 डिसेंबरला मध्यरात्री म्हणजेच 12.30 वाजता हा सामना असणार आहे. या सामना अतितटीचा होईल असा क्रीडा विश्लेषकांचं म्हणणं आहे. मेस्सीचा हा शेवटचा वर्ल्डकप असल्याने यासोबत क्रीडाप्रेमींच्या भावना जुळलेल्या आहेत. पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियाने पराभूत केल्यानं अर्जेंटिना संघावर टिकेची झोड उठली होती. मात्र त्यानंतर जोरदार कमबॅक केलं.
नेदरलँडनं साखळी फेरीत जबरदस्त कामगिरी केली आहे. कतार आणि सेनेगलला पराभवाची धुळ चारली. तर इक्वॉडोरविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. सुपर 16 मध्ये युएसएचा 3-1 ने पराभव केला.
Your move, Cristiano.#FIFAWorldCup | #Qatar2022
— FIFA World Cup (@FIFAWorldCup) December 6, 2022
उपांत्यपूर्व फेरीतील तिसरा सामना पोर्तुगाल विरुद्ध मोरोक्को यांच्यात रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार 10 डिसेंबरला संध्याकाली 8.30 वाजता हा सामना असणार आहे. या सामन्यात पोर्तुगालचं पारडं जड आहे. मेस्सीप्रमाणे पोर्तुगालच्या रोनाल्डोचा शेवटचा वर्ल्डकप असणार आहे. त्यामुळे भावना जुळलेल्या आहेत. पोर्तुगालने साखळी फेरीत घाना, उरुग्वे, साउथ कोरिया यांना पराभूत केलं. तर सुपर 16 मध्ये स्वित्झर्लंडचा 6-1ने धुव्वा उडवला.
दुसरीकडे मोरोक्कोकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जात आहे. साखळी फेरीत तगड्या बेल्जियमचा 2-0 ने पराभव करत आपली छाप पाडली आहे. त्यानंतर कॅनडाचा 2-1 पराभव केला. तर क्रोएशिया विरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. सुपर 16 फेरीत स्पेनविरुद्धचा सामना बरोबरीत सुटला. मात्र पेनल्टी शूटआउटमध्ये स्पेनचा 3-0 ने पराभव केला.
बातमी वाचा- क्या बात है! ब्राझीलच्या 'या' खेळाडूनं चार वेळा डोक्यावर उडवला फुटबॉल आणि केला असा गोल; Watch Video
उपांत्यपूर्व फेरीतील चौथा सामना इंग्लंड विरुद्ध फ्रान्स यांच्यात रंगणार आहे. भारतीय वेळेनुसार 11 डिसेंबरला मध्यरात्री म्हणजेच 12.30 वाजता हा सामना असणार आहे. हा सामना अतितटीचा होईल असं क्रीडाप्रेमींचं म्हणणं आहे. इंग्लंडनं साखळी फेरीत दमदार कामगिरी केली. इराणचा 6-2 आणि वेल्सचा 3-0 ने पराभव केला. त्यानंतर युएसएसोबतचा सामना बरोबरीत सुटला. त्यानंतर सुपर 16 फेरीत सेनेगलचा 3-0 ने पराभव केला.
दुसरीकडे, फ्रान्सनं साखळी फेरीत ऑस्ट्रेलिया आमि डेन्मार्कचा पराभव केला. तर टुनिसियाकडून हार पत्कारावी लागली. सुपर 16 फेरीत पोलंडचा 3-1 ने पराभव करत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली.