फुटबॉल कोचने सेलिब्रेशनच्या बहाण्याने महिला कर्मचाऱ्याच्या छातीवर हात ठेवला अन् नंतर...; VIDEO व्हायरल

स्पेनच्या महिला फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज विलदा (Spanish head coach Jorge Vilda) यांचा Fifa Women World Cup च्या अंतिम सामन्यातील एक व्हिडीओ व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत जॉर्ज महिला कर्मचाऱ्याच्या छातीला हात लावताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.   

Updated: Aug 23, 2023, 01:21 PM IST
फुटबॉल कोचने सेलिब्रेशनच्या बहाण्याने महिला कर्मचाऱ्याच्या छातीवर हात ठेवला अन् नंतर...; VIDEO व्हायरल title=

स्पेनचा महिला फूटबॉल संघ फिफा वर्ल्डकप (Fifa Women World Cup) जिंकत विश्वविजेता ठरला आहे. अंतिम सामन्यात स्पेनने इंग्लंडला 1-0 ने पराभूत केलं आणि विश्वविजेतेपद पटकावलं. ओल्गा कार्मोनाने हा एकमेव गोल करत स्पेनला पहिल्यांदाच विश्वविजेता होण्याचा मान मिळवून दिला. दरम्यान एकीकडे महिला संघाने विश्वजेतेपद जिंकलं असताना, विजयापेक्षा वादच जास्त रंगलेले दिसत आहेत. स्पेनची स्ट्रायकर जेनी हर्मोसोला स्पॅनिश एफए अध्यक्ष लुईस रुबियल्स यांनी सेलिब्रेशन करताना किस केल्याने वाद रंगला असताना आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये संघाचे मुख्य प्रशिक्षक जॉर्ज विलदा (Spanish head coach Jorge Vilda) महिला कर्मचाऱ्याच्या छातीला हात लावताना दिसत आहेत.

व्हायरल झालेल्या व्हिडीओत जॉर्ज विलदा चुकीच्या पद्धतीने महिला कर्मचाऱ्याला स्पर्श करताना कैद झाले आहेत. ओल्गा कार्मोनाने 29 व्या मिनिटाला गोल केल्यानंतर सेलिब्रेशन केलं जात असताना हा प्रकार घडला. यावेळी स्पेनचे कर्मचारी सेलिब्रेशन करत असताना जॉर्ज यांचा हात महिला कर्मचाऱ्याच्या छातीवर असल्याचं दिसत आहे. 

VIDEO: आधी मिठीत ओढलं, नंतर थेट ओठांवर 3 वेळा Kiss; महिला फुटबॉल खेळाडूवर मैदानातच जबरदस्ती, पंतप्रधानही संतापले

स्पेनच्या महिला संघाने गेल्या काही वर्षांमध्ये यशस्वी कामगिरी केली असून यामध्ये जॉर्ज यांचा मोलाचा वाटा आहे.  मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यापासून त्यांनी उल्लेखनीय यश मिळवलं आहे. त्यांनी संघाला Algarve Cup आणि Cyprus Cup मिळवून दिला असून आता आता विश्वचषक जिंकला आहे.

 

फूटबॉल अध्यक्षांनी महिला खेळाडूला किस केल्याने वाद

सामना जिंकल्यानंतर खेळाडू मंचावर मेडल स्विकारत पुढे जात होत्या. यावेळी खाली स्पॅनिश एफएचे अध्यक्ष लुईस रुबियल्स इतरांसह खेळाडूंच्या अभिनंदनासाठी उभे होते. यादरम्यान ते प्रत्येक महिला खेळाडूला मिठी मारत, गालावर किस करत होते. यादरम्यान महिला खेळाडूही थोड्या अवघडल्यासारख्या दिसत होत्या. यावेळी स्पेनची स्टार खेळाडू जेनी हर्मोसो आली असता लुईस रुबियल्स यांनी तिलाही घट्ट मिठी मारली. यानंतर त्यांनी थेट ओठांवर किस केला. यादरम्यान त्यांनी जेनीला जबरदस्तीने घट्ट पकडून ठेवल्याचं दिसत आहे. 

लुईस फक्त इतक्यावरच थांबले नाहीत, तर 3 वेळा किस केल्यानंतर जेनी जाताना तिच्या पाठीवर हात मारतानाही दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून, यानंतर टीकेची झोड उठली आहे. स्पेनमध्ये संतापाची लाटच पसरली असून, देशाच्या पंतप्रधानांनीही दखल घेतली आहे. पंतप्रधान पेड्रो सांचेज (Pedro Sanchez) यांनी म्हटलं आहे की, "जे काही आपण पाहिलं आहे ते अस्वीकारार्ह आहे".