IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11

Team India Playing XI vs Afghanistan Super 8 T20 World Cup: 20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे.  बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे.

सुरभि जगदीश | Updated: Jun 18, 2024, 04:33 PM IST
IND vs AFG: अफगाणिस्तानविरूद्ध 'या' खेळाडूची टीम इंडियामध्ये होणार एन्ट्री; कशी असेल प्लेईंग 11 title=

India playing XI against Afghanistan in Super 8 match: टी-20 वर्ल्डकपमध्ये आता लीग स्टेजचे सर्व सामने संपुष्टात आले असून सुपर 8 च्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. यावेळी टीम इंडियानेही सुपर 8 मध्ये स्थान मिळवलं आहे. टीम इंडियाने अ गटातील गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवून सुपर 8 मध्ये स्थान मिळवले होते. आता या टीमला अफगाणिस्तान विरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, यावर एक नजर टाकूया.

20 जून रोजी अफगाणिस्तान विरूद्ध भारत यांच्यात टी-20 वर्ल्डकपमध्ये लढत होणार आहे.  बार्बाडोसमध्ये होणाऱ्या या सामन्यात टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये फारसा बदल होणार नसल्याची शक्यता आहे. मात्र तरी कुलदीप यादवचा प्लेइंग 11 मध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. बार्बाडोसचं पीच पाहता भारतीय टीम मॅनेजमेंट तीन वेगवान गोलंदाज आणि तीन स्पिन गोलंदाजांसह मैदानात उतरू शकते. अफगाणिस्तान टीमने आतापर्यंत भारताविरुद्ध एकही टी-20 सामना जिंकला नाहीये. 

कुलदीप यादवची प्लेईंग 11 मध्ये होणार एन्ट्री?

बार्बाडोसमध्ये जसा खेळ होत राहिल त्यानंतर पीच स्लो संथ होण्याची शक्यता आहे. अशावेळी या ठिकाणी स्पिनर्सना मदत मिळू शकणार आहे. या मैदानावर टॉसची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. अशावेळी तीन स्पिनर्ससोबत मैदानात उतरणं टीमसाठी फायदेशीर ठरू शकते. ग्रुप मॅचमध्ये टीम इंडियाने रवींद्र जडेजा आणि अक्षर पटेल यांना प्रत्येक मॅचमध्ये स्पिनर्स म्हणून खेळवले होते. अशावेळी कुलदीप यादवला तिसरा स्पिनर्स म्हणून टीममध्ये समाविष्ट केलं जाऊ शकतं. 

कोणाला मिळणार टीममधून बाहेरचा रस्ता?

अफगाणिस्तानविरुद्ध जडेजा, अक्षर आणि कुलदीप हे तीन स्पिनर्स म्हणून टीममध्ये असू शकतात. तर कुलदीपचा टीममध्ये प्रवेश झाल्यास वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजला वगळलं जाऊ शकतं. सिराजला टीमबाहेर काढल्यास टीम इंडियाकडे जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्या हे वेगवान गोलंदाज म्हणून टीममध्ये असतील. याचा फलंदाजीवर परिणाम होण्याची शक्यता कमी आहे.

अफगाणिस्तानविरूद्ध टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग 11

रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग.