'मितालीची सचिनशी तुलना नको'

वनडे क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करत नवा विश्वविक्रम रचणाऱ्या मिताली राजचे सर्वच स्तरातून कौतुक होतेय. अनेकांनी तर तिची तुलना भारताचा क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकरशी केलीये. मात्र यावर भारताचे माजी क्रिकेट सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केलीये.

Updated: Jul 14, 2017, 03:51 PM IST
'मितालीची सचिनशी तुलना नको' title=

नवी दिल्ली : वनडे क्रिकेटमध्ये ६००० धावा पूर्ण करत नवा विश्वविक्रम रचणाऱ्या मिताली राजचे सर्वच स्तरातून कौतुक होतेय. अनेकांनी तर तिची तुलना भारताचा क्रिकेटमधील देव सचिन तेंडुलकरशी केलीये. मात्र यावर भारताचे माजी क्रिकेट सुनील गावस्कर यांनी नाराजी व्यक्त केलीये.

गावस्कर म्हणाले, मितालीची तुलना सचिन तेंडुलकरशी नको. मिताली राज स्वत:च एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. तिने स्वत:ला इतक्या मोठ्या उंचीवर नेऊन ठेवलेय. याचे आपण सेलिब्रेशन केले पाहिजे. मितालीने आपल्या करिअरमध्ये चांगले प्रदर्शन केलेय. तिने स्वत:ला सिद्ध केलेय ज्यामुळे तिची तुलना पुरुष क्रिकेटरशी नको. 

मितालीने १६व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते आणि पहिल्याच सामन्यात आर्यलंडविरुद्ध ११४ धावा केल्या होत्या. मितालीने भारताकडून १८३ वनडे खेळताना ६०२८ धावा केल्यात.