मोहम्मद शमी वादावर पहिल्यांदाच बोलला धोनी असं काही...

भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरु असलेल्या वादावार भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं पहिल्यांदाच बोलला आहे.

Updated: Mar 12, 2018, 06:06 PM IST
मोहम्मद शमी वादावर पहिल्यांदाच बोलला धोनी असं काही... title=

मुंबई : भारताचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये सुरु असलेल्या वादावार भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंग धोनीनं पहिल्यांदाच बोलला आहे. धोनीनं या वादावर मोहम्मद शमीला पाठिंबा दिला आहे. जनसत्ता डॉट कॉमला दिलेल्या मुलाखतीमध्ये धोनीनं या वादावर भाष्य केलं. मी शमीला चांगलं ओळखतो. तो चांगला माणूस आहे, तो पत्नीची आणि देशाची फसवणूक करणार नाही, असं धोनी म्हणाला आहे.

शमीच्या वैयक्तिक आयुष्याबाबत माध्यमं आणि नागरिकांनी पडू नये, असा सल्लाही धोनीनं दिला. मोहम्मद शमीच्या कारकिर्दीमध्ये धोनीनं मोठी भूमिका बजावली आहे.

कपील देव यांचाही शमीला पाठिंबा

धोनीच्या आधी कपील देव यांनीही मोहम्मद शमीला पाठिंबा दिला होता. शमीच्या पत्नीनं केलेल्या आरोपांवर माझा विश्वास नाही, असं कपील देव म्हणाले होते. मॅच फिक्सिंगबाबत शमीच्या पत्नीला आधीच माहिती होतं, मग दोघांचं नातं चांगलं होतं तेव्हा ती गप्प का होती? असा सवाल कपील देव यांनी विचारला आहे.

या सगळ्या आरोपांची यंत्रणांकडून चौकशी होऊ दे. शमीनं असं केलं असेल तर याचा कधीही स्वीकार होऊ शकत नाही, असं कपील देव म्हणाले.

पत्नीनं केलेल्या आरोपांनंतर बीसीसीआयनं शमीबरोबरच्या कराराचं नुतनीकरण केलेलं नाही. ७ मार्चला बीसीसीआयनं खेळाडूंसोबतच्या कराराची घोषणा केली होती.