IPL 2024: धोनीकडून घोडचूक झाली मात्र रोहितने कधीही...; MI च्या माजी खेळाडूचा खळबळजनक दावा

IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असणार आहे. रोहित शर्मा यापुढे मैदानात कर्णधारपद भूषवताना दिसणार नाही. 

सुरभि जगदीश | Updated: Mar 20, 2024, 07:21 PM IST
IPL 2024: धोनीकडून घोडचूक झाली मात्र रोहितने कधीही...; MI च्या माजी खेळाडूचा खळबळजनक दावा title=

IPL 2024: येत्या 22 तारखेपासून आयपीएलच्या रणसंग्रामाला सुरुवात होणार आहे. यंदाच्या सिझनमध्ये पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू यांच्यामध्ये खेळवला जाणार आहे. यावेळी सर्वांचं लक्ष मुंबई इंडियन्सच्या टीमकडे असणार आहे. मुंबईचा पहिला सामना गुजरात टायटन्सशी रंगणार आहे. दरम्यान आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूने एक मोठं विधान केलं आहे. 

आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असणार आहे. रोहित शर्मा यापुढे मैदानात कर्णधारपद भूषवताना दिसणार नाही. अशातच माजी क्रिकेटर पार्थिव पटेलने रोहितचे खूप कौतुक केलं आहे. धोनीने आयपीएलमध्ये घोडचूक केली पण रोहितने कधीही ती चूक केली नाही, असं पार्थिव पटेलने म्हटलं आहे.

काय म्हणाला पार्थिव पटेल?

जिओ सिनेमावर बोलताना पार्थिव पटेल म्हणाला, “सर्वात चांगली गोष्ट म्हणजे रोहित शर्मा त्याच्या टीममधील खेळाडूंना खूप सपोर्ट करतो. याचं उत्तम उदाहरण म्हणजे हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह. बुमराह 2014 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये आला होता. यावेळी अवघ्या एका वर्षात म्हणजेच 2015 पर्यंत बुमराहच्या कामगिरीत सुधारणा झाली. त्याचप्रमाणे तो 2015 मध्ये हार्दिकसोबत आला होता आणि 2016 मध्ये त्याची कामगिरी फारशी चांगली नव्हती. मात्र तरीही मुंबईची टीम त्याच्यासोबत होती.

पार्थिवच्या म्हणण्यानुसार, मुंबई इंडियन्स दोन वेळा एका रनने जिंकली होती. ही गोष्ट एका शांत कर्णधाराशिवाय हे होणं अशक्य होतं. जेव्हा सामना तणावपूर्ण असतो तेव्हा कधी चुकीचे निर्णय घेतले जातात तर कधी मोठ्या घोडचूक केल्या जातात. पण रोहितच्या 10 वर्षांच्या कर्णधारपदात कोणतीही चूक झाली नाही. मात्र धोनीने एकदा पवन नेगीला एक ओव्हर देऊन चूक केली होती. पण जर तुम्ही रोहितकडे बघितलं तर त्याच्याकडून कोणतीही चूक झालेली नाही.

दोन्ही टीम 5 वेळा आहेत चॅम्पियन

मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही टीमने 16 सिझनमध्ये 5-5 वेळा जेतेपद जिंकलं आहे. 158 सामन्यात कर्णधार असताना रोहित शर्माने 87 सामने जिंकले आहेत, तर 67 सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. या महान कर्णधाराची विजयाची टक्केवारी 55.06 होती. मुंबई टीमने आतापर्यंत जी 5 विजेतेपदे जिंकली आहेत ती देखील रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली झाली आहेत.