Derek Underwood : गावस्करांना धडकी भरवणाऱ्या इंग्लंडच्या महान गोलंदाजाचं निधन, झटकल्या होत्या 3000 विकेट्स

England cricketer death : इग्लंडचे दिग्गज क्रिकेटर डेरेक अंडरवूड यांचं सोमवारी निधन झालं, डेरेक हे 78 वर्षांचे होते. आपल्या अलौकिक क्रिकेट करिअरमध्ये डेरेक अंडरवूड यांनी तब्बल 3000 पेक्षा जास्त विकेट्स घेतल्या होत्या. 1960 आणि 70 च्या दशकात या ऑफस्पिनरला खेळणं अनेक खेळाडूंना जवळजवळ अशक्य व्हायचं. मात्र, डेरेक हे आपल्या बॉलिंगच्या विशिष्ट स्टाईलमुळे क्रिकेट जगात प्रसिद्ध होते. त्यांनी आपल्या करिअरमध्ये 86 टेस्टमध्ये 297 विकेट्स झटकल्या होत्या आणि इंग्लंडकडून टेस्टमध्ये कोणत्याही स्पिनरचे एवढ्या विकेट्स नाही. डेरेक अंडरवूड यांच्या नावावर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 2465, लिस्ट ए मध्ये 572, टेस्टमध्ये 297, तर वनडेमध्ये 32 विकेट्स घेतल्या आहेत. तर साऱ्या विकेट्स एकत्र करूण अंडरवूड यांनी जवळपास 3000 पेक्षा जास्त वेळेस फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पण अंडरवूड यांनी खूप साऱ्या फलंदाजांना आपल्या फिरकीच्या जाळ्यात फसवलं होतं. त्यामुळे त्यांच्या नावाची ख्याती जगभर पसरली होती.

दिग्गज फलंदाजांना दिला होता त्रास

1977 मध्ये भारताविरूद्ध झालेल्या पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीझमध्ये अंडरवूड यांनी 29 विकेट्स झटकल्या होत्या. या प्रदर्शनामुळे इंग्लंडच्या संघानी ही टेस्ट सिरीज 3-1 ने आपल्या नावावर केली होती. आपल्या टेस्ट काराकिर्दित अंडरवूडने, भारतीय क्रिकेटचे 'लिटील मास्टर' म्हणून ओळखले जाणारे, सुनिल गावस्कर यांना एकूण 12 वेळेस आपल्या जाळ्यात फसवले होते. फक्त एवढेच नव्हे तर, पाकिस्तानी पूर्व क्रिकेटर इमरान खान आणि वेस्ट इंडिजचे दिग्गज फलंदाज माइकल होल्डिंग यांना देखील अंडरवूड यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये प्रत्येकी 11 वेळेस आउट केलं आहे. त्यामुळे फलंदाजांनी देखील त्यांच्या गोलंदाजीची धास्ती घेतली होती.

इंग्लंडच्या दिग्गजावर गावस्करांचे वत्कव्य

नुकताच झालेल्या एका मुलाखतीत सुनील गावस्कर यांनी इंग्लंडचे दिग्गज क्रिकेटर डेरेक अंडरवूड यांच्याविषयी एक खास वक्तव्य केलं होतं. गावस्कर म्हणाले 'अंडरवूड यांच्यासमोर फलंदाजी करणं फार अवघड गोष्ट असायची, कारण त्यांची गोलंदाजी ही फार अचूक आणि टप्यावर असायची', यानंतर गावस्कर बोलले की, 'बॉलिंग करताना अंडरवूड आपल्या हिशोबाने बॉलचा स्पीड बदलवायचे, यामुळे फलंदाजाला शॉट खेळायला खूप अवघड व्हायचं, माझ्या क्रिकेट करिअरमध्ये मी ज्या सर्वात अवघड गोलंदाजांचा सामना केला आहे, ते म्हणजे डेरेक अंडरवूड आणि अँडी रॉबर्ट्स.'

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिली श्रद्धांजली

इंग्लंड क्रिकेट बोर्डाने पण आपल्या सोशल मिडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेयर करत डेरेक अंडरवूड यांना भावपूर्ण श्रद्धांजली दिलीये आणि पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "अंडरवुड हे इंग्लंडचे सर्वात महान ऑफ स्पिनर आहे, ते सदैव साऱ्या क्रिकेट फॅन्सच्या हृदयात असतील", तर  'इंग्लंडच्या सर्वात महान स्पिनरांमधील एक आणि क्रिकेटमधील खरे दिग्गज यांनी रेस्ट इन पीस', असं म्हणत इंग्लंड क्रिकेट बोर्डाने श्रद्धांजली अर्पण केली आहे.

English Title (For URL purpose only - Max 200 characters): 
Derek Underwood: Death of England's great bowler who scared Gavaskar, had taken 3000 wickets
Home Title: 

Derek Underwood : गावस्करांना धडकी भरवणाऱ्या इंग्लंडच्या महान गोलंदाजाचं निधन, झटकल्या होत्या 3000 विकेट्स

Derek Underwood : गावस्करांना धडकी भरवणाऱ्या इंग्लंडच्या महान गोलंदाजाचं निधन, झटकल्या होत्या 3000 विकेट्स
Yes
No
Facebook Instant Article: 
Yes
Mobile Title: 
Derek Underwood : गावस्करांना धडकी भरवणाऱ्या इंग्लंडच्या महान गोलंदाजाचं निधन, झटकल्
Publish Later: 
No
Publish At: 
Tuesday, April 16, 2024 - 17:09
Created By: 
Intern
Updated By: 
Intern
Published By: 
Intern
Request Count: 
1
Is Breaking News: 
No
Word Count: 
360