'दंगल गर्ल' गीता फोगटच्या घरी आला 'राजकुमार'

ट्विटरवर शेअर केला गोंडस बाळाचे फोटो 

Updated: Dec 26, 2019, 08:23 AM IST
'दंगल गर्ल' गीता फोगटच्या घरी आला 'राजकुमार' title=

मुंबई : 'दबंग गर्ल' गीता फोगट मंगळवारी आई झाली आहे. गीता फोगटने गोंडस मुलाला जन्म दिला आहे. राजकुमाराचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. गीता फोगटने सुंदर कॅप्शन देत बाळाचा फोटो शेअर केला आहे. 

गीताने मंगळवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे. बाळाच्या येण्याने पूर्ण झालेल्या कुटुंबाचा फोटो गीताने ट्विटरवर शेअर केला आहे. या फोटोत बाळ, गीता आणि पती पवन कुमार देखील आहे. 'हॅलो बॉय, या जगात तुझे स्वागत आहे. हा आनंदाचा क्षण मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही'.

गीताने 20 नोव्हेंबर 2016 रोजी रेसलर पवन कुमारसोबत लग्न केलं होतं. गीताने 2010 साली राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला सुवर्ण पदक जिंकवून दिले होते. 

अभिनेता आमिर खानने ब्लॉकबस्टर सिनेमा 'दंगल' हा गीता फोगट आणि तिच्या बहिणींच्या जीवनावर आधारित होता. या सिनेमात गीताच्या वडिलांची म्हणजे महावीर फोगट यांची भूमिका स्वतः आमिरने साकारली होती.