मुंबई : 2022 च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडू चांगली कामगिरी करत आहे. प्रत्येक दिवशी खेळाडू उत्कृष्ट कामगिरी करत भारतीय खात्यात पदकांचा आकडा वाढवत आहे. त्यात आज भारताच्या एका खेळाडूला अपघात झाल्याची घटना घडलीय. या संबंधित व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
कॉमनवेल्थ गेम्समध्ये सायकलिंगची स्पर्धा होती. या स्पर्धेत भारतीय सायकलपटू मीनाक्षीचा महिलांच्या 10 किमी स्क्रॅच शर्यतीत अपघात झाला. शर्यंत सुरु झाल्यानंतर मीनाक्षी अचानक बाईकवरून पडताना दिसली. अपघातानंतर फार दुरपर्यंत ती फरफटत गेली. इतकेच नव्हे तर प्रतिस्पर्ध्याची सायकल देखील त्यांच्या अंगावरून गेली. अपघाताच्या वेळी न्यूझीलंडची ब्रायोनी बोथा मीनाक्षीच्या शेजारी जात होती, त्यामुळे तीही अपघाताची शिकार झाली.
ट्रॅकवर स्ट्रेचर मागवली
या अपघातानंतर वैद्यकीय पथक घाईघाईने सायकल ट्रॅकवर पोहोचले होते. त्यानंतर दोन्ही खेळाडू शर्यतीतून बाहेर फेकले गेले. त्याचवेळी मीनाक्षीला स्ट्रेचरवर नेण्यात आले. या संदर्भातला व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Horrible accident involving Indian cyclist Meenakshi at the Velodrome. Hope she’s ok! #CommonwealthGames #B2022 pic.twitter.com/o0i4CE7M82
— Sahil Oberoi (@SahilOberoi1) August 1, 2022
लॉरा केनीला सुवर्णपदक
सायकलींगच्या 10 किमी स्क्रॅच शर्यतीत इंग्लंडची लॉरा केनी देखील सामील झाली होती. जी शर्यत थांबण्यापूर्वी आघाडीवर होती. या स्पर्धेत इंग्लंडच्या लॉरा केनीने सुवर्णपदक पटकावले आहे.