IPL 2023 Final : BCCI वर लागतोय मॅच फिक्सिंगचा आरोप; फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ

CSK vs GT IPL 2023 Final : आयपीएलचा फायनल सामना 'रिझर्व्ह डे' च्या दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे. अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत असून बीसीसीआयवर ( BCCI ) मॅच फिक्सिंगचा ( Match fixing ) आरोप लावण्यात येतोय. 

Updated: May 29, 2023, 06:11 PM IST
IPL 2023 Final : BCCI वर लागतोय मॅच फिक्सिंगचा आरोप; फोटो व्हायरल झाल्याने एकच खळबळ title=

CSK vs GT IPL 2023 Final : 28 मे रोजी आयपीएलचा ( IPL 2023 ) फायनल सामना खेळवण्यात येणार होता. मात्र या दिवशी पावसाने खेळ केल्याने सामना होऊ शकला नाही. त्यामुळे आयपीएलचा हा फायनल सामना 'रिझर्व्ह डे' ( IPL 2023 Final On Reserve day ) च्या दिवशी म्हणजेच आज खेळवण्यात येणार आहे. मात्र अशातच सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल ( Social Media Viral Photo ) होताना दिसतोय. या फोटोवरून बीसीसीआयवर मॅच फिक्सिंगचा आरोप करण्यात येतोय.

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर ( Narendra Modi Stadium ) पाऊस पडला, यामुळे सामना होऊ शकला नाही. मात्र अशातच चाहत्यांना धक्का बसेल अशी गोष्ट समोर आली. खासकरून चेन्नई सुपर किंग्जच्या ( Chennai Super Kings ) चाहत्यांसाठी ही धक्कादायक असा एक फोटो समोर आला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या फोटोने थेट आयपीएल 2023 च्या चॅम्पियन टीमची घोषणा केली होती. 

बीसीसीआयवर लागतायत फिक्सिंगचे आरोप

आयपीएल 2023 ( IPL 2023 ) चा फायनल सामना चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) विरूद्ध गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) यांच्यात खेळला जाणार आहे. नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमवर पावसाने हा सामना होऊ शकला नाही. मात्र यावेळीच स्टेडियमवरील स्क्रिनवर एक मजकूर दिसून आला. यामध्ये ‘चेन्नई सुपरकिंग्स रनर अप आहेत' असं दिसून आलं. दरम्यान हे पाहून धोनीचे चाहते संतापले असून यानंतर बीसीसीआयवर ( BCCI ) मॅच फिक्सिंगचा ( Match fixing ) आरोप लावण्यात येतोय. 

चाहत्यांच्या म्हणण्याप्रमाणे, प्रसारण वाहिन्यांनी यापूर्वीच काही गोष्टी तयार करून ठेवल्या आहेत, ज्यामुळे घटनेनंतर या गोष्टी तातडीने प्रसारीत करता येतील. दरम्यान काही लोकांच्या म्हणण्यानुसार, आयपीएल स्क्रिप्टेड असून काही गोष्टी लीक झाल्या आहे. दरम्यान हा फोटो खरा आहे की एडिटेड याची खातरजामा झी 24 तासने केलेली नाही. 

यंदाही चेन्नईसोबत एक योगायोग दिसून येतोय. प्लेऑफ आणि क्वालिफायर यांचा नियम 2011 पासून सुरु झाला. तेव्हापासून चेन्नईची टीम 2011, 2018, 2021 आणि 2023 यावेळी फायनलमध्ये पोहोचली आहे. हा योगायोग म्हणजे गेल्या तीन वेळा चेन्नईने अंतिम फेरी गाठली तेव्हा साखळी फेरीनंतर पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर होती. 2011, 2018 आणि 2021 मध्ये चेन्नईचा टीम फायनलमध्ये पोहोचल्यानंतर चॅम्पियन बनली होती.