धोनीच्या हाती कॅप्टन्सी येताच या खेळाडूचं भवितव्य धोक्यात?

धोनीच्या हाती कॅप्टन्सी... 'या' खेळाडू नाराज, टीममधून होणार पत्ता कट? पाहा कोण 'तो' खेळाडू 

Updated: May 1, 2022, 04:33 PM IST
धोनीच्या हाती कॅप्टन्सी येताच या खेळाडूचं भवितव्य धोक्यात? title=

मुंबई : रविंद्र जडेजाने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेऊन सगळ्यांनाच हैराण केलं. महेंद्रसिंह धोनीकडे पुन्हा एकदा कर्णधारपद आलं आहे. त्यानंतर आता चेन्नई टीम फुल्ल फॉर्ममध्ये खेळताना दिसले अशा चाहत्यांना विश्वास आहे. 

आता महेंद्रसिंह धोनीकडे कर्णधारपद आल्यानंतर एका खेळाडूचं भवितव्य धोक्यात आलं आहे. गेल्या काही सामन्यात तो सतत खराब फॉर्ममध्ये असल्याने त्याचा पत्ता कट होऊ शकतो. 

गेल्या काही दिवसांपासून ऋतुराज गायकवाड अत्यंत खराब फॉर्ममध्ये खेळताना दिसत आहे. त्याचा वाईट फॉर्म पाहता त्याला टीममधून बाहेर बसवलं जाण्याची शक्यता आहे. 

ऋतुराज गायकवाडचा फ्लॉप शो टीमसाठी ओझं होतं असल्याचं दिसत आहे. त्यामुळे महेंद्रसिंह धोनी टीममधून त्याचा पत्ता कट करू शकतो. गेल्यावर्षी ऋतुराजने ऑरेंज कॅप जिंकली होती. मात्र यंदाच्या हंगामात विशेष कामगिरी करताना दिसला नाही. 

गेल्या हंगामातील ऋतुराजची कामगिरी 
गेल्या हंगामात ऋतुराज पूर्ण हिट ठरला. त्याने आयपीएलच्या 16 सामन्यांमध्ये 635 धावा करून ऑरेंज कॅप आपल्या नावावर केली. त्याने आयपीएलमध्ये पहिलं शतकही ठोकलं होतं. के एल राहुल आणि शिखर धवनला मागे टाकून ऋतुराजने उत्तम कामगिरी केली. त्याचं कौतुकही खूप झालं होतं.