Cristiano Ronaldo च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; भारतात खेळायला येऊ शकतो स्टार फुटबॉलपटू

रोनाल्डो अल नासर फुटबॉल क्लबकडून खेळताना दिसणार आहे. या करारानंतर आता रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. रोनाल्डो आगामी काळात त्याच्या नव्या क्लबसह भारताला भेट देऊ शकतो

Updated: Jan 8, 2023, 10:51 PM IST
Cristiano Ronaldo च्या चाहत्यांसाठी मोठी बातमी; भारतात खेळायला येऊ शकतो स्टार फुटबॉलपटू title=

Cristiano Ronaldo India : फिफा वर्ल्ड कपमधील पराभवानंतर आता क्रिस्टियानो रोनाल्डोने नुकतंच एक मोठी घोषणा केली आहे. क्रिस्टियानो रोनाल्डो (Cristiano Ronaldo) ने नुकतंच अरेबियाच्या अल नासर (Al Nassr) फुटबॉल क्लबशी करार केला आहे. त्यामुळे आता रोनाल्डो अल नासर फुटबॉल क्लबकडून खेळताना दिसणार आहे. या करारानंतर आता रोनाल्डो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. 

37 वर्षीय रोनाल्डोचा अल-नासारसोबतचा करार आशियाई फुटबॉलसाठीही मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. भारतात देखील ख्रिस्तियानो रोनाल्डोचे चाहते आहेत. दरम्यान भारतीय चाहत्यांसाठी ही एक आनंदाची बातमी असू शकते कारण, दिग्गज खेळाडू रोनाल्डो आगामी काळात त्याच्या नव्या क्लबसह भारताला भेट देऊ शकतो.

ख्रिस्तियानो रोनाल्डो आता अल-नासारसोबत करारबद्ध झाल्यामुळे AFC चॅम्पियन्स लीगमध्ये भाग घेणार आहे. मुळात ही आशियाची मुख्य स्पर्धा मानली जाते. 2023-24 AFC चॅम्पियन्स लीगमध्ये सौदी अरेबियासाठी तीन ग्रुप स्टेज आणि एक प्ले-ऑफ फेरीचा स्लॉट राखून ठेवण्यात आला आहे.

जर अल-नासरने लीग किंवा देशांतर्गत कप जिंकला तर या टीमला थेट एएफसी चॅम्पियन्स लीगमध्ये प्रवेश मिळू शकणार आहे. सौदी अरेबिया आणि भारत AFC च्या पश्चिम विभागाचा संबंध असल्याने अल-नासरला लीग टप्प्यामध्ये एखाद्या भारतीय क्लबचा सामना करावा लागू शकतो. अशा परिस्थितीत क्रिस्टियानो रोनाल्डो ग्रुप स्टेजच्या दोन टप्प्यांपैकी एकामध्ये आयएसएल क्लबचा सामना करण्यासाठी भारतात येण्याची शक्यता आहे.

भारताकडे एएफसी चॅम्पियन्स लीग 2023-24 मध्ये डायरेक्ट ग्रुप स्टेज स्लॉट आहे. या स्लॉटचा निर्णय 2021-22 आणि 2022-23 च्या आयएसएल विनर्स शील्ड विजेत्यांमध्ये होणाऱ्या प्लेऑफद्वारे ठरवलं जाणार आहे. 2021-22 आयएसएल लीगचे विजेते जमशेदपुर एफसी होते. जमशेदपुर एफसीने प्लेऑफमध्ये एन्ट्री केली आहे.

इतक्या कोटींना खरेदी

क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) अखेर सौदी अरेबियाच्या अल नासर फुटबॉल क्लबशी करार केला आहे. हा करार 200 दशलक्ष युरो (सुमारे 1775 कोटी रुपये) मध्ये पूर्ण झाल्याचे मानले जात आहे. या करारानंतर तो जगातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.  

अडीच वर्षांचा करार

पोर्तुगाल फुटबॉल संघाचा कर्णधार क्रिस्टियानो रोनाल्डोने (Cristiano Ronaldo) सौदी अरेबियाच्या अल नासर या क्लबसोबत अडीच वर्षांचा करार केला आहे. यासह तो जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू बनला आहे. युरोपमध्ये अनेक वर्षे खेळल्यानंतर तो आता आशियाई क्लबकडून खेळणार आहे.