Mohammed Shami wife Hasin Jahan: रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) मिशन एशिया कपची (Asia Cup 2022) दमदार सुरुवात केली आहे. एशिया कपच्या पहिल्याच सामन्यात भारतीय संघाने कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 5 विकेटने धुव्वा उडवला. या विजयाबरोबर भारतीय संघाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या पराभवाचा बदलाही घेतला.
भारताच्या या विजयानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची (Mohammed Shami) पत्नी हसीन जहाँने (Hasin Jahan) इंस्टाग्रामवर (Instagram) या विजयाचा आनंद साजरा करताना एक पोस्ट केली आहे. मात्र या पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
काय आहे हसीन जहाँची पोस्ट?
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर हसीन जहाँने हार्दिक पांड्याचा (Hardik Pandya) एक फोटो शेअर करत टीम इंडियाचं अभिनंदन केलं आहे. पण फोटोबरोबर तिने एक वाक्य लिहिलं असून यावेळी खळबळ उडाली आहे. हसीन जहाँने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय 'अभिनंदन... एक संस्मरणीय विजय, देशाला जेतेपद मिळवून दिल्याबद्दल धन्यवाद, देशाची प्रतिष्ठा, प्रामाणिकपणा, देशभक्तांकडून जपली जाते. गुन्हेगार स्त्रीलंपटापासून नाही.
या पोस्टमधून हसीन जहाँने थेट मोहम्मद शमीला टार्गेट केल्याच्या प्रतिक्रिया उटमत आहेत.
क्रिकेट चाहत्यांनी हसीनला सुनावलं
हसीन जहाँच्या या पोस्टवर मोहम्मद शमीच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मोहम्मद शमीने देशासाठी चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे क्रिकेट चाहत्यांनी हसीन जहाँला चांगलंच सुनावलं आहे. याआधीही हसीन जहाँने सोशल मीडियावर काही वादग्रस्त पोस्ट केल्या आहेत.
शमी-हसीन अजून विभक्त नाहीत
मोहम्मद शमीसोबत वाद झाल्यानंतर हसीन जहाँ आपल्या मुलीसोबत वेगळी रहाते. मोहम्मद शमी आणि हसीन जहाँमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. पण दोघांमध्ये अजून तलाक झालेला नाही. 2018 मध्ये हसीन जहाँने मोहम्मद शमीवर मारहाण, बलात्कार, हत्येचा प्रयत्न आणि कौटुंबिक हिंसाचाराचा आरोप केला होता. हसीन जहाँने शमीबरोबर त्याच्या भावाविरोधातही तक्रार दाखल केली होती.