...म्हणून क्रिस गेलला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस !

वेस्टइंडीजचा दमदार फलंदाज क्रिस गेल याला गुरुवारी वॉर्म अप करताना दुखापत झाली आणि याचमुळे त्याला आता दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळता येणार नव्हता

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Sep 22, 2017, 09:43 AM IST
...म्हणून क्रिस गेलला हॉस्पिटलमध्ये साजरा करावा लागला वाढदिवस ! title=

नाटिंघम : वेस्टइंडीजचा दमदार फलंदाज क्रिस गेल याला गुरुवारी वॉर्म अप करताना दुखापत झाली आणि याचमुळे त्याला आता दुसरा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना खेळता येणार नव्हता. पण खास गोष्ट म्हणजे पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. आज गेल याचा वाढदिवस असून पायाचे स्नायू दुखावले गेल्यामुळे आपला वाढदिवस त्याला रुग्णालयातच साजरा करावा लागणार आहे. वेस्टइंडीज टीमचे प्रवक्ते यांनी सांगितले की, 'गेलला उपचारासाठी रुग्णालयात जावे लागेल.' 

गेल प्रथम सप्टेंबर १९९९ मध्ये भारताविरुद्ध वनडे खेळला होता. गेलचा पहिला कसोटी सामना मार्च २००० मध्ये झिम्बाबेविरुद्ध होता. कसोटी सामन्यात गेलने १०३ मॅचमध्ये ७२१४ धावा केल्या आहेत. यात त्याच्या १५ शतकांचा समावेश आहे. कसोटी सामन्यात त्याने दोन ट्रिपल सेन्चुरी देखील केल्या आहेत. 

एकदिवसीय सामन्यात गेलने २७० मॅचमध्ये ९२५८ इतक्या धावा केल्या आहेत. त्यात २२ शतके आहेत. टी-२० मध्ये गेलने ५२ सामन्यात १५७७ धाव केल्या आहेत. त्यात त्याने २ शतके झळकावली आहेत. त्याचबरोबर गेलने कसोटी सामन्यात ७३ विकेट, एकदिवसीय सामन्यात १६३ विकेट आणि टी-२० मध्ये १७ विकेट्स घेतल्या आहेत.