धोनीच्या बॅटमध्ये दडलंय शानदार फॉर्मचं गुपित

महेंद्र सिंह धोनी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सुरूवातीला शांतपणे खेळणारा धोनी क्रिजवर काही वेळ घालवल्यावर गगनचुंबी फटके मारताना दिसतो. मात्र अनेकदा असंही होतं की, तो काहीच रन करू शकत नाही.

Updated: Sep 22, 2017, 09:28 AM IST
धोनीच्या बॅटमध्ये दडलंय शानदार फॉर्मचं गुपित title=

नवी दिल्ली : महेंद्र सिंह धोनी सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. सुरूवातीला शांतपणे खेळणारा धोनी क्रिजवर काही वेळ घालवल्यावर गगनचुंबी फटके मारताना दिसतो. मात्र अनेकदा असंही होतं की, तो काहीच रन करू शकत नाही.

पण तरीही धोनी सतत इतके रन्स कसे करतोय? हा प्रश्न अनेकांना पडला आहे. याचाच खुलासा कोलकाता वनडे सामन्याआधी त्याची बॅट तयार करणा-या स्पार्टन कंपनीने केला आहे. स्पार्टन कंपनीच्या अधिका-यांनी सांगितले की, धोनीने त्याच्या बॅटचं वजन १० ग्रॅमने कमी केलं आहे. 

श्रीलंका दौ-यावेळी त्याच्या बॅटचं वजन हे १२३० ग्रॅम इतकं होतं. मात्र आता तो १२२० ग्रॅम वजन असलेल्या बॅटने खेळत आहे. यासोबतच धोनीने त्याच्या बॅटचं हॅन्डल जरा मोठ करवून घेतलं आहे. आणि त्याच्या बॅटच्या खालचा भाग हलका झाला आहे. धोनीने हा निर्णय १-२ रन्स काढण्यासाठी घेतला आहे. २०१६ मध्ये धोनीला स्ट्राईक बदलण्यासाठी अडचण येत होती. त्यामुळेच त्याने आता त्याच्या बॅटमध्ये हे बदल केले आहेत. 

आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे धोनी कधी कधी लांब पल्ल्याचे शॉट्स मारण्यासाठी त्याची वजनी बॅटही मागवतो. धोनीने २०१७ मध्ये ८९.५७ च्या सरासरीने रन्स केले आहेत. त्याने १४ सामन्यांमध्ये ६२७ रन्स केले आहेत. ज्यात एका शतकाचा तर ५ अर्धशतकांचा समावेश आहे. महत्वाची गोष्टी म्हणजे या खेळी खेळताना तो ७ वेळा नाबाद राहिला आहे. 

आपल्या चांगल्या फॉर्मचा सिलसिला त्याने ऑस्ट्रेलिया विरूद्ध सुरू असलेल्या वनडे सीरिजमध्येही कायम राखला आहे. चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने महत्वपूर्ण ७९ रन्सची खेळी केली. कोलकाता वनडे सामन्यात त्याने एक रेकॉर्डही कायम केला आहे. टीम इंडियासाठी ३०० वनडे खेळणारा तो सहावा खेळाडू ठरला आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने ३०० वनडे खेळण्याचा कारनामा केला होता. त्यातील ३ वनडे एशिया इलेव्हनसाठी तो खेळला होता. भारतासाठी त्याचा कोलकातामधील सामना ३०० वा आहे.