'जलेबी, ढोकला ये सब क्या है, नही चलेगा' हार्दिक पांड्या भडकला... Video व्हायरल

Hardik Pandya : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या सध्या टीम इंडियापासून दूर आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत हार्दिक पांड्या दुखापतग्रस्त झाला होता. सघ्या तो आयपीएलची तयारी करतोय. यादरम्यान त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय.

राजीव कासले | Updated: Feb 23, 2024, 06:23 PM IST
'जलेबी, ढोकला ये सब क्या है, नही चलेगा' हार्दिक पांड्या भडकला... Video व्हायरल title=

Hardik Pandya Video : टीम इंडियाचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्या (Hardik Pandya) दुखापतीमुळे टीम इंडियातून (Team India) सध्या बाहेर आहे. आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेत हार्दिकच्या पायाला दुखापत झाली होती. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात पायाने चेंडू अडवताना त्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावं लागलं. तेव्हापासून हार्दिक टीम इंडियातून एकही सामना खेळलेला नाही. सध्या हार्दिक पांड्या आयपीएलसाठी (IPL) सज्ज होतोय. बडोद्यात किरण मोरे क्रिकेट अकादमीत तो जोरदार सराव करतोय. या दरम्यान हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात एक शुटिंगदरम्यान तो संतापलेला दिसत आहे. 

जलेबी-ढोकळा पाहून भडकला
सोशल मीडियावर हार्दिक पांड्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत हार्दिक एका शुटिंगच्या सेटवर असल्याचं दिसंतय. त्याच्यासमोर एक प्लेट असून त्यात जिलेबी आणि ढोकळा ठेवलेला दिसतोय. पण ते पाहून हार्दिक चांगलाच भडकलेला (Hardik Pandya Angry) दिसतोय. यानंतर तो सेटवरच्या एक माणसाला खडसावताना दिसोतय. यात तो म्हणतोय 'हे काय आहे, भाई जिलेबी कशी खाणार, हे काय ढोकला... भाई फिटनेस करायचा असतो, हे सर्व कसं खाणार, कोणी पाठवलं आहे हे, माझा शेफ कुठे आहे, कसं मॅनेज करणार मी? डायरेक्टरला सांगा हे चालणार नाही. हे खाऊन माझा स्टॅमिना बिघडेल'

हार्दिक पांड्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. हा सेट नेमका कोणता आहे, आणि हार्दिक पांड्या कोणावर भडकला आहे याबाबत माहिती समोर आली नाही. पण हा व्हिडिओ साईटवरच्या कुणीतरी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार
आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने संघात मोठे बदल केले आहेत. रोहित शर्माची उचलबांगडी करत मुंबई इंडियन्सने हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्ती केली. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने पाच वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. पण आता आयपीएलच्या सतराव्या हंगामात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचं नेतृत्व करताना दिसणार आहे. मुंबईचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सबरोबर रंगणार आहे. 

गुजरातला मिळवून दिलं होतं जेतेपद
आयपीएल 2022 च्या हंगामात आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा समावेश झाला. या संघाचं कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आलं आणि पहिल्याच हंगामात हार्दिक पांड्याने गुजरात संघाला आयपीएलचं जेतेपद मिळवून दिलं. तर दुसऱ्या हंगामात हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात अंतिम फेरीत धडक मारली. आता मुंबईतून खेळताना हार्दिक गुजरातविरुद्ध कशी कामगिरी करतो याकडे क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे.