Harbhajan Singh About Virat Kohli : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर विराट कोहली हा काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत विरुद्ध बांगलादेश टेस्ट सीरिजमध्ये खेळताना दिसला. चेन्नईत झालेल्या पहिल्या सामन्यात विराटला चांगली कामगिरी करता आली नाही परंतु कानपुर येथे झालेल्या दुसऱ्या टेस्ट सामन्यात त्याने 47 आणि 29 धावांची खेळी केली. दरम्यान भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंहने कोहलीबाबत एका मुलाखतीत मोठे वक्तव्य केले आहे.
हरभजन सिंह मुलाखतीत विराट कोहलीच्या कॅप्टन्सीबाबत बोलत होता. भज्जीने म्हंटले की, 'विराट टीम इंडियाचा कॅप्टन असताना त्याने टीम इंडियात जी आग लावली, यासाठी हृदय, डोक आणि धाडस हवंय. भज्जीने म्हंटले की कोहली कधी मॅच ड्रॉ व्हावी असा विचार करत नाही. 'स्पोर्ट्स यारी' या चॅनलला मुलाखत देताना हरभजनने म्हंटले की, 'कोहलीच्या कॅप्टनसीमध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला नसूदेत पण त्याला खराब कर्णधार किंवा खराब खेळाडू नाही म्हंटलं पाहिजे. त्याने टीममध्ये जी आग लावली की भाई टेस्टच्या चौथ्या इनिंगमध्ये 400 धावा आहेत, आपण त्यासाठी जाऊ. चेज करता करता हरू पण घाबरायचं नाही. 100 वर ऑल आउट नाही व्हायचं. 370 वर ऑल आउट होऊ. पराभूत झाले तरी काही नाही पण समोरच्या टीमला नाकीनऊ आणू'.
हेही वाचा : रविवारपासून भारत - बांगलादेश टी20 सीरिज, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार LIVE?
भज्जीने पुढे म्हंटले की, 'ऑस्ट्रेलिया सारख्या देशात जाऊन तिथे 350 धावा चेज करणे आणि फक्त छोट्याश्या फरकाने पराभूत होणे यासाठी हिम्मत लागते. त्यासाठी हृदय हवं, त्यासाठी डोकं लागतं, धाडस लागतं, जे कोहलीने टीममध्ये निर्माण केलं. प्रत्येक कॅप्टननी टीमवर आपआपली छाप सोडली आहे'.
विराट कोहली क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये भारतासाठी चांगली कामगिरी करत आहे. टी 20 वर्ल्ड कप 2024 जिंकल्यावर त्याने टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर आता तो केवळ टेस्ट आणि वनडे फॉरमॅट खेळताना दिसतोय. विराटने आतापर्यंत 115 टेस्ट आणि 295 वनडे सामने खेळले असून याशिवाय त्याने 125 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कोहलीने टेस्टमध्ये 8947 धावा, वनडेमध्ये 13906 धावा तर टी 20 क्रिकेटमध्ये 4188 धावा केल्या आहेत.