क्रीडा जगतातील मोठी बातमी! Rohit Sharma टी20 क्रिकेटला अलविदा करणार? पत्रकार परिेषदेत केला खुलासा

IND vs SL 1st Odi: श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेत  कर्णधार रोहित शर्मा  टीम इंडियात  पुनरागमन करतोय, त्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने टी20 कारकार्दिबाबत मोठं वक्तव्य केलं आहे  

Updated: Jan 9, 2023, 08:47 PM IST
क्रीडा जगतातील मोठी बातमी! Rohit Sharma टी20 क्रिकेटला अलविदा करणार? पत्रकार परिेषदेत केला खुलासा title=

Rohit Sharma On T20 Career:टी20 वर्ल्ड कपमधल्या (T20 World Cup 2022) लाजीरवाण्या पराभवानंतर भारतीय टीमचा (Team India) कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) टी20 कर्णधारपदावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. टी20 वर्ल्ड कपनंतर रोहित शर्मा एकही टी20 सामना खेळलेला नाही. त्यामुळे रोहित शर्मासाठी टी20 संघाचे दरवाजे आता कायमचे बंद झाल्याची चर्चा सुरु आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेआधी (India vs Sri Lanka ODI Series) रोहित शर्माने पत्रकार परिषद घेत आपल्या टी20 कारकिर्दीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

रोहित शर्माचं मोठं वक्तव्य
गुवाहाटीत (Guwahati) घेतलेल्या पत्रकार परिषदेत टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सोडण्याची सध्यातरी कोणतीही योजना नसल्याचं रोहित शर्माने म्हटलं आहे. सातत्याने क्रिकेट खेळणं कोणत्याही खेळाडूला शक्य नाही. काही काळ विश्रांती घ्यावीच लागते. हीच परिस्थिती सध्या माझ्याबाबत आहे. टी20 क्रिकेट सोडण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही, आयपीएलनंतर (IPL) याबाबत विचार करु असं रोहित शर्माने म्हटलं आहे.

टी20 वर्ल्ड कपआधी बदलाची शक्यता
भारतीय क्रिकेट बोर्डाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 2024 मध्ये वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपासाठी हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वात युवा टीमची बांधणी केली जात आहे. श्रीलंकेविरुद्धच्या टी20 मालिकेत रोहित शर्मा, विराट कोहली आणि के एल राहुल यांचा समावेश करण्यात आला नव्हता. अशात त्यांना आगामी टी20 सीरिजमध्येही कितपत संधी मिळेल याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. 

रोहित शर्माची टी20 कारकिर्द
रोहित शर्मा टीम इंडियासाठी आतापर्यंत 148 टी20 सामने खेळला आहे. या सामन्यात रोहित शर्माने 30.82 च्या स्ट्राईक रेटने 3853 धावा केल्या आहेत. यात 29 अर्धशतक आणि 4 शतकांचा समावेश आहे. टी20 सामन्यात भारतासाठी सर्वाधिक शतक करणारा तो एकमेव क्रिकेटर आहे. 

एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), विराट कोहली, शुभमन गिल, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, हार्दिक पंड्या (उप कर्णधार), ईशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, कुलदीप यादव , मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक.

एकदिवीस मालिकेसाठी श्रीलंका संघ
दासुन शनाका (कर्णधार), नुवानिडु फर्नांडो, आविष्का फर्नांडो, अशेन बंडारा, पथुम निसंका, धनंजय डिसिल्वा, चरित असलंका, चामिका करुणारत्ने, कुसल मेंडिस (विकेटकीपर), सदीरा समरविक्रमा (विकेटकीपर), दिलशान मदुशंका, प्रमोद मदुशन, डुनिथ वेलालेज, जेफरी वेंडरसे, कासुन राजिथा, लाहिरू कुमारा और महीष तीक्ष्णा.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक
10 जानेवरी- पहिला एकदिवसीय सामना,  गुवाहाटी, दुपारी 1.30 
12 जानेवरी- दूसरा एकदिवसीय सामना, कोलकाता, दुपारी 1.30 
15 जानेवरी- तीसरा एकदिवसीय सामना, तिरुवनंतपुरम, दुपारी 1.30