VIDEO: नजर हटी दुर्घटना घटी! Live मॅच सोडून 'हा' क्रिकेटपटू पत्नीला पाहत राहिला अन्...

Cricket News Marathi: क्रिकेटच्या मैदानात एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाल. ती गोष्ट म्हणजे एका क्रिकेटपटूची पत्नी सामना बघायला आली अन्....काही क्षणासाठी लाईव्ह सामना थांबावा लागला... नेमकं असं काय घडलं की लाईव्ह सामना काही क्षणासाठी थांबावा लागला...

Updated: Jan 12, 2023, 10:38 AM IST
VIDEO: नजर हटी दुर्घटना घटी! Live मॅच सोडून 'हा' क्रिकेटपटू पत्नीला पाहत राहिला अन्...   title=

PAK vs NZ: पाकिस्तान संघ सध्या मायदेशात न्यूझीलंडविरूद्ध ( pak vs nz test) वन डे मालिका खेळत आहे. अशातच काल (11 जानेवारी 2023 ) न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत सर्फराज अहमद (sarfaraz ahmed) पाकिस्तानचा हिरो म्हणून उदयास आला. याच सामन्यादरम्यान एका क्रिकेटपटू सोबत नजर हटी दुर्घटना घटी असा काहीसा प्रकार घडून आला. 

न्यूझीलंड-पाकिस्तान यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका उदासिन राहिली. पहिल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानला पराभवाला समोरे जावे लागले तर तर दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडला यजमानांच्या अखेरच्या विकेटने तंगवले. मात्र या दोन सामन्यांच्या मालिकेत पाकिस्तान संघातील सर्फराज अहमदने ( Sarfaraz Ahmed) आपली छाप पाडली आहे. या मालिकेत त्याने सर्वाधिक 335 धावा केल्या. मात्र सर्फराजने दुसऱ्या कसोटीत शतक झळकावताना पाकिस्तानला पराभवाचा सामना करावा लागला. 

मात्र नॅशनल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या न्यूझीलंड-पाकिस्तान याच्या लाईव्ह सामन्यादरम्यान एक मजेशीर गोष्ट घडली. ती गोष्ट म्हणजे किवी अष्टपैलू डॅरिल मिशेल गोलंदाजी करायला येताच, सरफराज अहमदला खेळाच्या मैदानाच्या विरुद्ध दिशेने चालताना पाहून वेगवान गोलंदाजाने आपली गोलंदाजी थांबवली आणि सरफराज नेमकं लाईव्ह सामन्यात काय करतोय हे जाणून घेयाच होत.

सर्फराज न्यूझीलंडसोबत एकटा भिडत होता. त्याची ही फटकेबाजी पाहण्यासाठी सरफराजची पत्नी स्टेडियमवर आली होती. सरफराज क्रिकेटच्या मैदानात बाहेर बाजूच्या दिशेने उभा होता, त्याचवेळी सरफराज लाईव्ह सामन्यात स्टेडियममध्ये लावलेल्या मोठ्या स्क्रीनवर दिसत असलेल्या आपल्या पत्नीकडे पाहत होता. गोलंदाज मिशेल वाटेत थांबला आणि सरफराज नेमक काय बघतो हे पाहत बसला. तेव्हा सरफराजचा बॅटिंग पार्टनर सौद शकील सैफीने सरफराजला विचारल, भाईला काय झालं भैया.... त्यानंतर त्याने खेळाकडे लक्ष दे असे सर्फराजला सांगितले.  

खरंतर सरफराजने कॅमेरा पत्नीकडे झूम करताच आपली फलंदाजी विसरला आणि तिला पाहता राहिला. क्षणभरासाठी सरफराज विसरला की त्याला सामन्यावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. दरम्यान पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत चार डावांत  83.75 च्या सरासरीने 335 धावा करून संपवली.