मुंबई : कोविड-19च्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट मंडळाने (BCCI) मोठा निर्णय घेतला आहे. यंदाची रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) रद्द करण्यात आली आहे. 87 वर्षांत प्रथमच रणजी ट्रॉफी बीसीसीआयनं रद्द केली आहे. बीसीसीआयचे सेक्रटरी जय शाह यांनी त्याबाबत प्रत्येक राज्याच्या क्रिकेट संघटनांना पत्र लिहिले आहे. पण विजय हजारे ट्रॉफी होणार असल्याचं बीसीसीआयनं सांगितले आहे.
कोरोनामुळे यंदाची रणजी ट्रॉफी होणार नाही. आयपीएलपर्यंत रणजी आणि हजारे या दोनपैकी एकच स्पर्धा होऊ शकते. रणजी स्पर्धेला जास्त वेळ लागत असल्याने रणजी रद्द करुन विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा होणार आहे.
भारतीय क्रिकेटपटू घडवणारी ही सर्वात मोठी स्पर्धा ओळखली जाते. रणजी ट्रॉफी रणजी ट्रॉफीच्या (Ranji Trophy) दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज 45 हजार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय देखील BCCI ने घेतला आहे.
सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा (Syed Mushtaq Ali Trophy 2021) सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI ने घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमनध्ये एक दिवसांच्या लढती असतात. त्यामुळे या स्पर्धा होणार आहेत.
दरम्यान, विजय हजारे स्पर्धा खेळवली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेचे वेळापत्रक अंतिम करण्यात येईल. त्यानंतर खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करतील. एक महिना ही स्पर्धा चालणार आहे. विजय हजारेसह महिलांच्या वरीष्ठ गटातील वन-डे स्पर्धा खेळवण्याचा निर्णय देखील भारतीय क्रिकेट मंडळाने घेतला आहे.