अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची लॉटरी, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचंही कमबॅक... सर्फराज आऊट

Irani Cup : भारत आणि बांगलादेशदरम्यान 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे. इराणी कप स्पर्धेसाठी मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाची घोषणा करण्यात आली आहे. 

राजीव कासले | Updated: Sep 24, 2024, 07:28 PM IST
अजिंक्य रहाणेला कर्णधारपदाची लॉटरी, पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरचंही कमबॅक... सर्फराज आऊट title=

Irani Cup : भारत आणि बांगलादेशदरम्यान 27 सप्टेंबरपासून दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. त्याआधी मोठी घडामोड समोर आली आहे. इराणी कप स्पर्धेसाठी (Irani Cup) मुंबई (Mumbai) आणि रेस्ट ऑफ इंडिया संघाची (Rest of India) घोषणा करण्यात आली आहे. मुंबई संघाची धुरा अजिंक्य राहणेच्या खांद्यावर देण्यात आली आहे. मुंबई संघात 16 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पृथ्वी शॉ आणि श्रेयस अय्यरचं मुंबई संघाता कमबॅक झालंय. तर सर्फराज खानला संधी देण्यात आलेली नाही. सर्फराज खान सध्या भारतीय कसोटी संघात आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सर्फराज खानला संधी मिळाली नाही तर त्याला रिलीज करण्यात येईल. यामुळे तो इराणी कप स्पर्धा खेळू शकेल अशी माहिती बीसीसीआयने दिली आहे. येत्या 1 ऑक्टोबरपासून इराणी कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे.

रहाणेकडे मुंबईची कमान

मुंबई संधाची धुरा अजिंक्य रहाणेकडे सोपवण्यात आली आहे. याशिवाय आक्रमक फलंदाज श्रेयस अय्यरलाही मुंबई संघात संधी देण्यात आली आहे. दुलीप ट्रॉफीत श्रेयस अय्यरला समाधानकारक कामगिरी करता आलेली नव्हती. याशिवाय सिद्धेश लाडचं मुंबई संघात पुनरागम झालं आहे. तर आयुष म्हात्रेला पहिल्यांदाच मुंबईत संघात संधी मिळाली आहे.

रेस्ट ऑफ इंडियाचा संघ

रेस्ट ऑफ इंडियाची कमान ऋतुराज गायकवाडच्या हातात देण्यात आली आहे. तर अभिमन्यू ईश्वरनला उपकर्णधारपद देण्यात आलं आहे. धुव्र जुरेल आणि यश दयाललाही संधी देण्यात आली आहे. सर्फराज खानप्रमाणेच यश दयाल आणि ध्रुव जुरेलचा टीम इंडियाच्या कसोटी संघात समावेश करण्यात आला आहे. पण कानपूर कसोटीत त्यांना प्लेईंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली नाही तर ते इराणी कप स्पर्धा खेळू शकतात.

इराणी कप स्पर्धा

इराणी कप ही भारतातील स्थानिक क्रिकेट स्पर्धा आहे. रणजी ट्रॉफी चॅम्पियन संघ आणि इतर संघातील बेस्ट खेळाडूंच्या संघात ज्याला रेस्ट ऑफ इंडिया म्हटलं जातं त्यांच्यात सामना होतो. पहिल्यांदा 1959-60 मध्ये इराणी कपचा सामना खेळवण्यात आला होता. मुंबई संघाने आतापर्यंत सर्वाधिक 14 वेळा इराणी कपवर आपलं नाव कोरलं आहे. पण गेल्या 25 वर्षांपासून मुंबईला जेतेपदाने हुलकावणी दिली आहे.

मुंबई : अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तमोरे, सिद्धांत अधटराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशु सिंह, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन दियास.

रेस्ट ऑफ इंडिया : ऋतुराज गायकवाड, अभिमन्यु ईश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, ईशान किशन, मानव सुथार, सारांश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चाहर