Arjun Tendulkar Birthday: मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) गॉड ऑफ क्रिकेट म्हटलं जातं. क्रिकेट जगतातील जवळपास प्रत्येक विक्रम सचिनच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकरनंतर आता त्याचा मुलगा अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) मैदान गाजवतोय. 1999 मध्ये जन्मलेला अर्जुन 24 सप्टेंबरला 25 वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अद्याप पदार्पण झालं नसलं तरी आयपीएल आणि रणजी क्रिकेटमध्ये अर्जुन तेंडुलकरने आपलं नाव कमावलं आहे.
अर्जुन तेंडुलकरची क्रिकेट कारकिर्द?
अर्जुन तेंडुलकर डाव्या हाताने वेगवान गोलंदाजी करतो. यासोबतच तो आक्रमक फलंदाज म्हणूनही ओळखला जातो. रणजी ट्रॉफीत अर्जुन गोवा संघाकडून खेळतो. मुंबईविरुद्धच्या सामन्यात केलेल्या जबरदस्त कामगिरीनंतर अर्जुन तेंडुलकर चर्चेत आला. स्थानिक क्रिकेटमध्ये अर्जुनने आतापर्यंत दमदार कामगिरी केलीय. स्थानिक क्रिकेटमधल्या कामगिरीच्या जोरावर अर्जुनने आयपीएलमध्येही (IPL) एन्ट्री मारली. मुंबई इंडियन्सने अर्जुनला बेस प्राईज 20 लाखांना खरेदी केलं. अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये खेळण्याची फारशी संधी मिळालेली नाही.
आतापर्यंत अर्जुन आयपीएलमध्ये केवळ 5 सामने खेळलाय. यात त्याने 3 विकेट घेतल्या असून 13 धावा केल्या आहेत. 19 धावात एक विकेट ही आयपीएलमधली त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.
अर्जुन तेंडुलकरची नेटवर्थ?
एका रिपोर्टनुसार अर्जुन तेंडुलकरची एकूण संपत्ती साधारण 21 कोटी रुपये इतकी आहे. यातली सर्वाधिक कमाई ही स्थानिक क्रिकेटमधून आहे. आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरला आतापर्यंत 1 कोटी रुपये मिळाले आहेत. आयपीएल 2025 हंगामापूर्वी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यावेळी अर्जुन तेंडुलकरला किती रक्कम मिळणार, कोणता संघ बोली लावणार हे स्पष्ट होईल.
24 तारखेशी खास नातं
अर्जुन तेंडुलकर वडिल सचिन तेंडुलकर यांच्यासह मुंबईतल्या उच्चभ्रू भागात राहातो. तेंडुलकर कुटुंबाचं 24 तारखेशी खास नातं आहे. 24 सप्टेंबरला अर्जुन तेंडुलकरचा वाढदिवस असतो. तर 24 एप्रिलला सचिन तेंडुलकर आपला वाढदिवस साजरा करतो. विशेष म्हणजे 24 मे रोजी सचिन-अंजली तेंडुलकरच्या लग्नाचा वाढदिवस असतो.