Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या तारखा लिहून ठेवा, 15 दिवसात तीनवेळा आमने सामने

Asia Cup 2023: एशिया कप 2023 स्पर्धेच्या तारखा या आठवड्यात जाहीर होण्याची शक्यता आहे. एशिया स्पर्धेत कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात आहेत. त्यामुळे 15 दिवसातच तब्बल तीन वेळा भारत आणि पाकिस्तानदरम्यान एकमेकांविरुद्ध भिडणार आहेत. 

राजीव कासले | Updated: Jul 17, 2023, 02:30 PM IST
Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान सामन्याच्या तारखा लिहून ठेवा, 15 दिवसात तीनवेळा आमने सामने  title=

Asia Cup 2023: भारतात या वर्षाच्या अखेरीत एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धा (ODI World Cup 2023) खेळवली जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानात (Pakistan) एशिया कप स्पर्धा रंगणार आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात ही स्पर्धा होणार असून या स्पर्धेचं वेळापत्रक अद्याप जाहीर करण्यात आलेलं नाही. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) यांच्या सामन्याच्या ठिकाणावरुन वाद सुरु आहे. बीसीसीआयने टीम इंडिया (Team India) पाकिस्तानात पाठवण्यास नकार दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानाने हायब्रिड मॉडलची (Highbreed Model) ऑफर केली आहे. त्यानुसार आशिया कप स्पर्धेतले 4 सामने पाकिस्तानात तर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जातील. 31 ऑगस्ट ते 17 सप्टेंबरदरम्यान ही स्पर्धा खेळवली जाईल. श्रीलंका आशिया कप स्पर्धेची गतविजेता संघ आहे. 

'या' तारखांना आमने सामने
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भारत आणि पाकिस्तानदरम्यान (India vs Pakistan) 2 सप्टेंबरला पहिला सामना खेळवला जाईल. या स्पर्धेत एकून सहा संघ सहभागी होणार आहेत. यात भारत आणि पाकिस्तानशिवाय श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि नेपाळ या संघांचा समावेश आहे. प्रत्येकी 3 संघ दोन ग्रुपमध्ये विभागाण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तान एकाच ग्रुपमध्ये आहे. दोनी ग्रुपमधील टॉपचे चार संघ सुपर-4 मध्ये पोहोचतली. सुपर-4 (Super-4) मध्ये टीम इंडियाचा 10 सप्टेंबरला बाबर आझमच्या पाकिस्ताशी सामना होऊ शकतो. भारत आणि पाकिस्तानदरम्यानचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवली जातील.

19 तारखेला वेळात्रक
19 जुलैरोजी म्हणेज बुधवारी आशिया कप स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहचेल, तर 17 सप्टेंबरला हे दोन्ही संघ आमने सामने येतील. म्हणजे 15 दिवास भारत-पाक तीन वेळा भिडतील. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानदरम्यान 15 ऑक्टोबरला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी जवळवास 1 लाख क्रिकेटप्रेमी स्टेडिअममध्ये उपस्थित राहाण्याची शक्यता वर्तवली जातेय. हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. 

भारतीय संघाचे सामने
8 ऑक्टोबर vs ऑस्ट्रेलिया , चेन्नई 
11  ऑक्टोबर vs अफगाणिस्तान  दिल्ली
15 ऑक्टोबर vs पाकिस्तान, अहमदाबाद
19 ऑक्टोबर vs बांगलादेश, पुणे
22 ऑक्टोबरvs न्यूजीलँड, धरमशाला
29 ऑक्टोबर vs इंग्लंड, लखनऊ
2  नोव्हेंबर vs क्वालिफायर 2 (श्रीलंका), मुंबई
5 नोव्हेंबर vs साउथ अफ्रीका, कोलकाता
11 नोव्हेंबर vs क्वालिफायर 1 (नेदरलँड) , बंगळुरु