Ravichandran Ashwin 500 Test Wickets : भारत आणि इंग्लंडदरम्यान सुरु असलेल्या राजकोट कसोटीच्या (Rajkot Test) दुसऱ्या दिवशी टीम इंडियाचा (Ream India) दिग्गज आणि अनुभवी फिरकी गोलंदाज रवींचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) इतिहास रचला. अश्विनने कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी आर अश्विनने इंग्लंडचा सलामीवीर जॅक क्राऊलीला बाद करत ही ऐतिहासिक कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये 500 क्रिकेटचा टप्पा गाठणार आर अश्विन हा दुसरा भारतीय गोलंदाज ठरला आहे.
कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 500 विकेट
कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 500 विकेट घेणारा अश्विन हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. अश्विनने अवघ्या 98 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान 500 विकेट घेण्याचा विक्रम मुथय्या मुरलीधरनच्या नावावर आहे. मुरलीधरनने अवघ्या 87 कसोटी सामन्यात 500 विकेटचा टप्पा पूर्ण केला होता. भारताचा महान फिरकी गोलंदाज अनिल कुंबळेने 105 सामन्यात तर ऑस्ट्रेलियाचा फिरकी गोलंदाज शेन वॉर्नने 108 कसोटी सामन्यात हा विक्रम केला होता. म्हणजे अश्विनने वेगवान 500 विकेट घेण्याच्या शर्यतीत अनिल कुंबळे आणि शेन वॉर्नला मागे टाकलं आहे.
सर्वाधिक कसोटी विकेट
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका 1992-2010): 133 कसोटी- 800 विकेट
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया 1992-2007): 145 कसोटी- 708 विकेट
3. जेम्स अँडरसन (इंग्लंड 2003-2023): 185* कसोटी- 696* विकेट
4. अनिल कुंबळे (भारत 1990-2008): 132 कसोटी- 619 विकेट
5. स्टुअर्ट ब्रॉड (इंग्लंड 2007-2023): 167 कसोटी- 604 विकेट
6. ग्लेन मॅक्ग्रा (ऑस्ट्रेलिया 1993-2007): 124 कसोटी- 563 विकेट
7. कर्टनी वॉल्श (वेस्टइंडीज 1984-2001): 132 कसोटी- 519 विकेट
8. नॅथन लिओन (ऑस्ट्रेलिया 2011-2023): 127* कसोटी- 517* विकेट
9. रविचंद्रन अश्विन (भारत 2011-2023): 98* कसोटी- 500* विकेट
कसोटी क्रिकेटमध्ये 500 विकेट घेणारे फिरकी गोलंदाज
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) : 133 कसोटी- 800 विकेट
2. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया): 145 कसोटी- 708 विकेट
3. अनिल कुंबळे (भारत): 132 कसोटी- 619 विकेट
4. नॅथन लिओन (ऑस्ट्रेलिया 2011-2023): 127* कसोटी- 517* विकेट
5. रविचंद्रन अश्विन (भारत 2011-2023): 98* कसोटी- 500* विकेट
कसोटी क्रिकेटमध्ये वेगवान 500 विकेट घेणारे गोलंदाज
1. मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका) - 87 टेस्ट
2. आर. अश्विन (भारत) - 98 कसोटी
3. अनिल कुंबले (भारत)- 105 कसोटी
4. शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया)- 108 कसोटी
5. ग्लेन मॅक्ग्रा (ऑस्ट्रेलिया)- 110 कसोटी
Only the second #TeamIndia cricketer to reach this landmark in Tests
Congratulations, @ashwinravi99 #INDvENG | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/bP8wUs6rd0
— BCCI (@BCCI) February 16, 2024
आर अश्विनची कारकिर्द
तामिळनाडूचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने 2011 मध्ये वेस्टइंडिजविरोधात दिल्ली कसोटी क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केलं. तेव्हापासून गेली बारा वर्ष अश्विन टीम इंडियाचा प्रमुख हिस्सा आहे. अश्विनने 34 वेळा पाच किंवा त्याहून अधिक विकेट घेण्याची कामगिरी केली आहे. तर आठ वेळा दहा किंवा त्याहून अधिक विकेट घेतल्या आहेत. 74 धावात 10 विकेट ही त्याची कसोटी क्रिकेटमधली सर्वोत्तम कामगिरी आहे.