Ball Tampering : भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान (India-Australia Test Series) चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना नागपूरमध्ये (Nagpur Test) खेळवला जात आहे. सामन्याच्या पहिल्याच दिवशी भारताचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजाने (Ravindra Jadeja) ऑस्ट्रेलियाची मधली फळी उद्ध्वस्त करुन टाकली. या धक्क्यातून ऑस्ट्रेलिया सावरलीच नाही, त्यांचा संपूर्ण संघ अवघ्या 177 धावात ऑलआऊट झाला. हा धक्का ऑस्ट्रेलियन मीडिया (Australian Media) सहन करु शकला नाही. त्यांनी रवींद्र जडेजावर बॉल टेम्परिंगचा (Ball Tempering) गंभीर आरोप केला आहे.
बॉल टेम्परिंगचा इतिहास
तसं पाहिलं तर ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा बॉल टेम्परिंगबाबत मोठा इतिहास आहे. पण यावेळी ऑस्ट्रेलिया मीडियाने टीम इंडियावरच (Team India) आरोप केला आहे. नागपूर कसोटी सामन्यात रवींद्र जडेजाच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियन संघ पुरता कोसळला. जडेजाच्या फिरकिला कसं खेळावं याचं त्यांच्याकडे उत्तरच नव्हतं. ऑस्ट्रेलियन संघाच्या अपयशाचं खापर मग ऑस्ट्रेलियान मीडियाने टीम इंडियावर फोडलं. ऑस्ट्रेलियने मीडियाने एक व्हिडिओ शेअर करत जडेजावर गंभीर आरोप केला. गोलंदाजी करताना रवींद्र जडेजाने बॉल टेम्परिंग केल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
नेमकं काय झालं मैदानात?
व्हिडिओत रवींद्र जडेजा मोहम्मद सिराजकडे (Mohammed Siraj) जातो आणि त्याच्याकडून काहीतरी घेऊन स्वत:च्या बोटावर लावतो. रवींद्र जडेजाने आपल्या बोटावर नेमकं काय लावलं याबाबत इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही प्रश्न उपस्थित केला. ऑस्ट्रेलियन मीडियानेही हा मुद्दा चांगलाच उचलून धरला. ऑस्ट्रेलियन मीडियाने केलेल्या आरोपांनंतर सोशल मीडियावर वाद सुरु झाला आहे. वाद वाढत असल्याचं पाहताच बीसीसीआयने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. बीसीसीआयाने दिलेल्या माहितीनुसार रवींद्र जडेजाचं बोट दुख होतं, यासाठी गोलंदाजाआधी त्याने बोटाला बाम लावला, असं बीसीसीआयने म्हटलं आहे.
जडेजा तब्बल 5 महिन्यांनी मैदानात उतरला आहे. पहिल्या कसोटी त्याने तब्बल 22 षटकं टाकली. मोठ्या ब्रेकनंतर आल्यामुळे त्याची बोटं दुखली असावीत, त्यासाठी केवळ वेदना घालवण्यासाठी त्याने बामचा वापर केला. यात बॉल टेम्परिंगचा कोणताही मुद्दा येत नाही, असं बीसीसीआयने म्हटलं आहे. पण ऑस्ट्रेलियन मीडियाने हा बॉल टेम्पेरिंगचा मुद्दा असल्याचं सांगत हे नियमांविरोधात असल्याचं सांगितलं आहे.
पण जडेजावर आरोप करणारी ऑस्ट्रेलियन मीडिया कदाचित त्यांच्या किती खेळाडूंवर बॉल टेम्परिंगचा आरोप होता हे विसरलं असेल. डेव्हिड वॉर्नर,स्टिव्ह स्मिथपासून कॅमरन ब्रेनक्रॉफ्टपर्यंत ऑस्ट्रेलियाचे अनेक खेळाडूंवर बॉल टेम्परिंगचा आरोप झाला आहे, आणि त्यांना शिक्षाही झाली आहे.