विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची अनोख्या पद्धतीने घोषणा, क्रिकेट जगतात असं पहिल्यांदाच घडलं

New Zealand World Cup Squad: आयसीसी विश्वचषक 2023  साठी न्यूझीलंड क्रिकेट संघाच्या 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. पण ज्या पद्धतीने न्यूझीलंड संघाची घोषणा झालीय असं जगात पहिल्यांदाच घडलं आहे. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

राजीव कासले | Updated: Sep 11, 2023, 04:10 PM IST
विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची अनोख्या पद्धतीने घोषणा, क्रिकेट जगतात असं पहिल्यांदाच घडलं  title=

New Zealand World Cup Squad: ऑक्टोबर महिन्यात आयसीसी एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेला (World Cup 2023) सुरुवात होणार आहे. 5 ऑक्टोबर ते 19 नोव्हेंबरदरम्यान भारतात ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी जवळपास सर्व देशांनी आपले संघ जाहीर केले आहेत. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने विश्वचषकासाठी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली. केने विल्यमसनकडे (Kane Williamson) या संघाची घोषणा करण्यात आली. या संघातून कायले जेमींसन, अॅडम मिल्ने आणि फिन एलेन यांना डच्चू देण्यता आला आहे. तर विल यंगची संघाची आश्चर्यकारक एन्ट्री झाली आहे.

अनोख्या पद्धतीने संघाची घोषणा
विश्वचषक स्पर्धेसाठी न्यूझीलंड बोर्डाने (New Zealand Cricket Board) संघाची घोषणा केली. पण ही घोषणा अगदी हटके पद्धतीने करण्यात आली आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने हा व्हिडिओ आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर शेअर केला असून या व्हिडिओचं कौतुक केलं जात आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला असून अनेक कमेंटसही आल्या आहेत. 

काय आहे व्हिडिओत
साधारणपणे संघाची घोषणा करताताना पत्रकार परिषद घेतली जाते. या पत्रकार परिषदेत संघाचा कर्णधार आणि चीफ सिलेक्टर संघाची घोषणा करतात. पण न्यूझीलंड संघाने चक्क खेळाडूंच्या कुटुंबाचाच नाव घोषित करण्यासाठी वापर केला आहे. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने एक व्हिडिओ बनवला असून या व्हिडिओत खेळाडूंच्या पत्नी आणि मुलं आपल्या नवऱ्याचं किंवा वडिलांची जर्सी नंबर आणि नाव सांगताना दिसत आहेत. या व्हिडिओची सुरुवात न्यूझीलंड संघाचा कर्णधार केन विल्यमसनची पत्नी आणि त्याच्या दोन मुलांपासून करण्यात आली आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठीह देखील कायले जेमीसन, अॅडम मिल्नेला संघात सहभागी करण्यात आलेलं नाही. ट्रेंट बोल्ट आणि जेम्स नीशम न्यूझीलंड क्रिकेटच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्टचा हिस्सा नाहीत. यानंतरही या दोघांन विश्वचषक संघात स्थान देण्यात आलेलं आहे. 

न्यूझीलंडची गोलंदाजी विरोधी संघात धडकी भरवणारी आहे. ट्रेंट बोल्ट, टिम साऊदी, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेनरी वेगावन गोलंदाजीची धुरा वाहतील. तर डेरेल मिचेल आणि जिमी नीशम अष्टपैलू खेळाडू असतील. इश सोढी आणि मिचेल सँटनर किवी संघात दोन स्पेशलिस्ट स्पिनर म्हणून असतील. 

विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघ
केन विलियमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमैन, डेवोन कॉनवे, लॉकी फर्गुसन, मॅट हेनरी, टॉम लाथम, डेरेल मिचेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रविंद्र, मिचेल सैंटनर, इश सोढी, टिम साउदी, विल यंग