ODI Team of the year 2023 : आयसीसीने वर्ष 2023 चा सर्वोत्तम टी20 संघ निवडल्यानंतर आता 2023 च्या सर्वोत्तम एकदिवसीय संघाचीही घोषणा केली आहे. 2023 मध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या 11 खेळाडूंना या संघात संधी देण्यता आली असून यात तब्बल सहा भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. आयसीसी (ICC) एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदाचा मान रोहित शर्माला (Rohit Sharma) देण्यात आला आहे. आयसीसीने निवडलेल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये विराट कोहीली (Virat Kohli) आणि शुभमन गिलचा (Shubhaman Gill) समावेश करण्यात आला आहे. विशेष गोष्ट म्हणजे एकदिवसीय विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलियातील केवळ 2 खेळाडूंना आयसीसी सर्वोत्तम एकदिवसीय संघात स्थान देण्यता आलं आहे. वर्ल्ड चॅम्पियन कर्णधार पॅट कमिन्स या संघात स्थान मिळवून शकलेला नाही. ऑस्ट्रेलियातर्फे केवळ ट्रेव्हिस हेड आणि अॅडम जम्पाला संधी देण्यात आली आहे.
आयसीसीने केली घोषणा
आयसीसीने निवडलेल्या सर्वोत्तम एकिदवसीय संघात रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांच्यावर सलामीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर तिसऱ्या क्रमांकावर ट्रेव्हिस हेडला निवडलं आहे. चौथ्या क्रमांकावर टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीला स्थान देण्यात आलं आहे. दक्षिण आप्रिकेचा विकेटकिपर हेनरिक क्लासेनला विकेटकिपर म्हणून संधी देण्यत आली आहे. एकदिवसीय विश्वचषकात वेगवान गोलंदाजीने छाप उमटवणाऱ्या दक्षिण आफ्रिकेच्या मार्को यानसनवर गोलंदाजीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. याशिवाय दुसरे वेगवान गोलंदाज म्हणून मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराजला पसंती देण्यात आली आहे.
आयसीसी सर्वोत्तम एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ट्रेविस हेड, विराट कोहली, डेरेल मिचेल, हेनरिक क्लासेन, मार्को यानसन, एडम जंपा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव आणि मोहम्मद शमी.
कोणत्या आधारीवर निवडले खेळाडू
- रोहित शर्माने 2023 मध्ये 52 च्या अॅव्हरेजने 1255 धावा केल्या आहेत. एकदिवसीय विश्वचषकात रोहितने अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात 131 धावा केल्या होत्या.
- शुभमन गिलने 2023 या वर्षात तब्बल 5 शतकं ठोकली होती. यात न्यूझीलंडविरुद्ध दुहेरी शतकाचा समावेश आहे.
- ट्रेव्हिस हेडने आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताविरुद्ध शानदार शतक ठोकत ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून दिला होता.
- विराट कोहलने गेल्या वर्षात तब्बल 1377 धावा केल्या आहेत. यात त्याने सहा शतकं केली असून विश्वचषकात प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा मानकरीही तो ठरला होता.
- न्यूझीलंडच्या डेरेल मिचेलने 2023 मध्ये पाच शतकं लगावली. या वर्षात त्याने 52.34 अॅव्हरेजने 1204 धावा केल्या.
- हेनरिक क्लासेनने वर्ष 2023 मध्ये दोन एकदिवसीय शतकं केली. विकेटकिपर म्हणूनही त्याची कामगिरी दमदार झालीय.
- मार्को यानसनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेण्याची कामगिरी केली होती. तर अॅडम जम्पाने 2023 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 38 विकेट घेतल्या.
- मोहम्मद शमीने 2023 या वर्षात तब्बल 44 विकेट घेतल्या. एकदिवसीय विश्वचषकात त्याने तब्बल चार वेळा पाच विकेट घेण्याची कामगिरी केली होती.
- भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने 2023 वर्षात एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 विकेट घेत आयसीसी बेस्ट वन डे संघात स्थान मिळवलंय.