Asia Cup 2023 : पाकिस्तान आणि श्रीलंकेत 30 ऑगस्टपासून एशिया कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ हे संघ या स्पर्धेत खेळताना दिसणार आहे. नेपाळ सोडल्यास इतर सर्व संघांसाठी ही स्पर्धा महत्त्वाची असणार आहे, कारण यानंतर पुढच्याच महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा (ODI WC 2023) खेळवली जाणार आहे. एशिया कप स्पर्धेत गेल्या वर्षी टीम इंडियाची (Team India) कामगिरी अतिशय निराशाजनक झाली होती. पण यंदा रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखील टीम इंडिया जिंकण्याच्या इराद्यानेच मैदानावर उतरेल.
दोन संघांचं नेतृत्व रोहितकडे
एशिया कप 2023 स्पर्धेत रोहित दोन संघांचं नेतृत्व करताना दिसणार आहे. आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण हे शक्य झालंय. एशिया कपसाठी अद्याप टीम इंडियाची घोषणा झालेली नाही. टीम इंडियाचं नेतृत्व रोहित शर्मा करणार हे जवळपास निश्चित आहेत. पण त्याचबरोबर आणखी एका संघाचं कर्णधारपद रोहितकडे आहे.
एशिया कप स्पर्धेत नेपाळचा संघ (Nepal Cricket) सहभागी होणार आहे. या स्पर्धेसाटी नेपाळच्या संघाची घोषणा करण्यात आली असून कर्णधारपदाची जबाबदारी रोहितवर सोपवण्यात आली आहे. याचं नाव आहे रोहित पॉडेल (Rohit Paudel). म्हणजेच एशिया कप स्पर्धेत रोहित नावाचे दोन कर्णधार असणार आहेत. नेपाळच्या संघात बलात्काराचा आरोप झालेल्या संदीप लामिछाने यालाही संधी देण्यात आली आहे. 30 ऑगस्टला पाकिस्तान आणि नेपाळदरम्यानच्या सामन्याने एशिया कप स्पर्धेची सुरुवात होील. त्यानंतर चार सप्टेंबरला नेपाळचा संघ श्रीलंकेत भारताशी दोन हात करेल. या सामन्यात दोन रोहित आमने सामने येतील.
एशिया कप स्पर्धेपूर्वी नेपाळचा संघाचं पाकिस्तानात सराव शिबिर होणार आहे. एक आठवड्याचं हे शिबिर असून पाकिस्तानच्या स्थानिक संघाबरोबर सराव सामन्यांचंही आयोजन करण्यात आलं आहे.
एशिया कपसाठी नेपाळचा संघ
रोहित पॉडेल (कर्णधार), आसिफ शेख, कुशाल भुर्तेल, ललित राजबंशी, भीम शारकी, कुशाल मल्ला, डीएस एरी, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, आरिफ शेख, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, किशोर महातो, संदीप जोरा
आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक :
पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट
बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट
भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर
बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर
भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर
श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर
सुपर-4 चे सामने कसे होतील?
A1 वि B2 - 6 सप्टेंबर
B1 वि B2 - 9 सप्टेंबर
A1 वि A2 - 10 सप्टेंबर
A2 वि B1 - 12 सप्टेंबर
A1 वि B1 - 14 सप्टेंबर
A2 वि B2 - 15 सप्टेंबर
फायनल सामना - 17 सप्टेंबर