इंग्लंड : इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये खेळल्या जात असलेल्या 22व्या कॉमनवेल्थ गेम्सचा आज पहिला दिवस आहे. त्याची सुरुवात गुरुवारी उद्घाटन समारंभाने झाली होती. आता शुक्रवारपासून खेळाडू मैदानात ताकद दाखवणार आहे. पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंना 10 सामन्यांमध्ये प्रवेश करायचा आहे. तर आजच्याच दिवशी बॅडमिंटनमध्ये भारत विरूद्ध पाकिस्तान आमनेसामने येणार आहेत.
दोन वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती पीव्ही सिंधू ही सलग दुसऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची ध्वजवाहक होती. त्याच्यानंतर दुसरा ध्वजवाहक मनप्रीत सिंग होता, ज्याने टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. सिंधूने कॉमनवेल्थमध्येही सुवर्ण आणि रौप्यपदक पटकावलं आहे.
कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या दिवसाचं शेड्यूल