बर्मिंगहम : भारताला कॉमनवेल्थ गेम्समध्ये (CWC 2022) पहिलवहिलं मेडल मिळालं आहे. महाराष्ट्राच्या मुलाने भारताला हे पहिलंवहिलं पदक मिळवून दिलं आहे. यासह भारताचं खातं उघडलं आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सांगलीच्या संकेत सरगरनं (Sanket Sargar) भारतासाठी सिल्वर मेडलची कमाई केली आहे. (commonwealth Games 2022 day 2 India wins first medal in cwg Sanket Mahadev Sargar wins silver medal in 55 kg category with a total of 248 kg)
सांगलीच्या 21 वर्षांच्या संकेतने वेटलिफ्टिंगमध्ये 55 किलो वजनी गटात रौप्य पदक मिळवलंय. संकेतला गोल्डन मेडल मिळवण्याची संधी होती, मात्र ती थोडक्यासाठी हुकली. संकेतला फायनलमध्ये 143 किलो वजन उचलताना दुखापत झाली. त्यामुळे संकेतला रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं.
wins its 1st at @birminghamcg22 #SanketSargar in a smashing performance lifted a total of 248 Kg in 55kg Men’s to clinch at #B2022
Sanket topped Snatch with best lift of 113kg & lifted 135kg in C&J
Congratulations Champ!
Wish you a speedy recovery#Cheer4India pic.twitter.com/oDGLYxFGAA— SAI Media (@Media_SAI) July 30, 2022
संकेतने केलेल्या या उल्लेखनीय कामगिरीसाठी त्याचं कौतुक केलं जातंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्ग्ज नेत्यांनी संकेतचं कौतुक केलंय. "संकेतने रौप्यपदक जिंकणं ही भारतासाठी चांगली सुरुवात आहे. त्यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा" अशा शब्दात मोदींनी ट्विद्वारे संकेतचं कौतुक केलंय.