वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठी घोषणा; सचिनच्या खास मित्राला अचानक बनवलं मेन्टॉर!

IND vs WI: भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिज संघाने सचिन तेंडुलकरच्या मित्राला मेन्टॉर (Mentor of West Indies) म्हणून नियुक्त केलं आहे. 

Updated: Jul 4, 2023, 03:53 PM IST
वेस्ट इंडिज दौऱ्याआधी मोठी घोषणा; सचिनच्या खास मित्राला अचानक बनवलं मेन्टॉर! title=
brian lara west indies team mentor of west indies

India vs West Indies : भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिजचा दौऱ्यावर आहे. जिथं टीमला 2 कसोटी, 3 एकदिवसीय आणि 5 टी-ट्वेंटी आंतरराष्ट्रीय सामने खेळायचे आहेत. 12 जुलै रोजी भारत आणि वेस्ट इंडिज (IND vs WI) यांच्यातील पहिला कसोटी सामना खेळवला जाणार असल्याने आता सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये (WTC) पराभव झाल्यामुळे आता या सिरीजचं काही कौतूक तसं नाही. मात्र, आता वेस्ट इंडिजसाठी ही सिरीज महत्त्वाची ठरणार आहे. वर्ल्ड कपमध्ये क्वालिफाय (CWC 2023) करता न आल्याने आता भारताचा पराभव करणं वेस्ट इंडिजसाठी गरजेचं असेल. त्यासाठीच आता वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाने मोठा निर्णय घेतला आहे.

भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी वेस्ट इंडिज संघाने सचिन तेंडुलकरच्या मित्राला मेन्टॉर (Mentor of West Indies) म्हणून नियुक्त केलं आहे. वेस्ट इंडिज संघाने सचिन तेंडुलकरचा मित्र ब्रायन लारा (Brian Lara) याला संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केल्याने आता वेस्ट इंडिज संघात मोठ्या बदलाची शक्यता आहे. ब्रायन लाराच्या मार्गदर्शनाखाली संघ कशी कामगिरी करणार हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. काही दिवसांपूर्वी सचिन आणि लारा दोन्ही मित्र लंडनमध्ये फिरताना दिसले होते.

एकदिवसीय मालिकेचं वेळापत्रक (IND vs WI ODI Series)

इंडिया विरुद्ध विंडिज, पहिला सामना (27 जुलै, बारबाडोस)

इंडिया विरुद्ध विंडिज, दूसरा सामना (29 जुलै, बारबाडोस)

इंडिया विरुद्ध विंडिज, तिसरा सामना (1 ऑगस्ट, त्रिनिदाद)

कसोटी मालिकेचं वेळापत्रक (IND vs WI Test Series)

विंडिज विरुद्ध टीम इंडिया, पहिली कसोटी (12 ते 16 जुलै, विंडसर पार्क, डोमिनिका)

विंडिज विरुद्ध टीम इंडिया, दुसरी कसोटी (20 ते 24 जुलै, क्विन्स पार्क, पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद)

विंडिज विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया (Team India for Test)

रोहित शर्मा (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, आर जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट आणि नवदीप सैनी.

आणखी वाचा - IND vs WI: वयाच्या 29 व्या वर्षी 'हा' खेळाडू करणार टीम इंडियामध्ये डेब्यू; भलेभले फलंदाज घाबरले!

विडिंज विरुद्धच्या वनडे सीरिजसाठी टीम इंडिया (Team India for T20 Series)

रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, उमरान मलिक आणि अर्शदीप सिंह.