Border Gavaskar Trophy : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India VS Australia) यांच्यात 22 नोव्हेंबर पासून 5 सामन्यांच्या टेस्ट सीरिजची (Test Series) बॉर्डर गावस्कर ट्रॉफी खेळवण्यात येणार आहे. यंदा बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (Border Gavaskar Trophy) ही ऑस्ट्रेलियात खेळवली जाणार असल्याने काही दिवसांपूर्वीच टीम इंडिया ऑस्ट्रेलियाला रवाना झाली. टीम इंडियाचा टेस्ट कर्णधार रोहित शर्मा हा वैयक्तिक कारणामुळे सीरिजमधील पहिल्या टेस्ट सामन्यात सहभाग घेणार नाही. त्यामुळे उपकर्णधार असलेला जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा टीम इंडियाचं नेतृत्व करेल. नुकतंच ट्रॉफीसोबत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स आणि टीम इंडियाचा कर्णधार बुमराह यांचं फोटोशूट पार पडलं. तसेच सामन्याच्या एक दिवस आधी कर्णधार बुमराहने पत्रकार परिषद सुद्धा घेतली. यात विराटबाबत बुमराह काही गोष्टी बोलला.
पहिल्या टेस्ट सामन्यापूर्वी पत्रकार परिषद घेत बुमराहने म्हटले की, 'जेव्हा जिंकतो तेव्हा पुन्हा शून्यापासूनच सुरुवात करतो आणि जेव्हा हरतो तेव्हा सुद्धा शून्यापासूनच सुरुवात करतो. आम्ही भारतातून येताना पूर्वीच ओझं, दडपण घेऊन आलेलो नाही. न्यूझीलंड सीरिजमधून आम्ही धडा घेतला आहे, पण इथली परिस्थिती वेगळी आहे. इथले परिणाम वेगळे आहेत'. तसेच बुमराहने सांगितले की, 'आम्ही प्लेईंग 11 तयार केली आहे. सामन्याच्या दिवशी सकाळी तुम्हाला समजेल'.
हेही वाचा : जयस्वाल नाही तर विराटनंतर 'हा' असेल भारतीय क्रिकेटचा किंग, सौरव गांगुलीने स्पष्टच सांगितलं
कर्णधार बुमराहने म्हटले की, 'विराट कोहली आमच्या टीमसाठी लीडरपैकी एक आहे. मी त्याच्या नेतृत्वात टेस्टमध्ये पदार्पण केले होते. मला फलंदाजीच्या बाबतीत विराट कोहली विषयी अजिबात शंका नाही. तो या खेळातील महान खेळाडूंपैकी एक आहे. तो आमच्या टीममध्ये सर्वात परफेक्ट आहे. एक किंवा दोन सीरिज वर खाली होऊ शकतात, पण सध्या त्याचा आत्मविश्वास चांगला आहे. मी यापेक्षा जास्त काही बोलून ते खराब करू इच्छित नाही.
टीम इंडियाच्या कर्णधारपदाची जबाबदारी बुमराहच्या खांद्यावर आल्यानंतर त्याने याविषयी आनंद व्यक्त केला. त्याने म्हटले की, 'टेस्ट क्रिकेट खेळणे आणि संघाचं नेतृत्व करणे यापेक्षा कोणता मोठा सन्मान नाही, अशी संधी भारतीय क्रिकेटमध्ये खूप कमी लोकांना मिळते. हा तो फॉरमॅट आहे, ज्यामध्ये मी लहानपणापासून खेळू इच्छित होतो. मी याकडे फक्त एक पद म्हणून पाहत नाही तर मला जबाबदारी घ्यायला आवडते. मला लहानपणापासून कठीण काम करायचे होते आणि हे आता माझ्यासाठी नवीन आव्हान आहे'.
पहिली टेस्ट: 22 ते 26 नोव्हेंबर
दुसरी टेस्ट: 6 ते 10 डिसेंबर
तिसरी टेस्ट: 14 ते 18 डिसेंबर
चौथी टेस्ट: 26 ते 30 डिसेंबर
पाचवी टेस्ट: 3 ते 7 जानेवारी