बर्थडे स्पेशल : ...म्हणून धोनीला मिळाले कर्णधारपद!

महेंद्रसिंग धोनी २००७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनला. 

Updated: Jul 7, 2018, 09:46 AM IST
बर्थडे स्पेशल : ...म्हणून धोनीला मिळाले कर्णधारपद! title=

मुंबई : महेंद्रसिंग धोनी २००७ मध्ये भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार बनला. बीसीसीआयने प्रयोग म्हणून ही जबाबदारी धोनीच्या खाद्यांवर दिली होती. मात्र धोनीने ही जबाबदारी अगदी उत्तम निभावली. टीम इंडियाला २००७ मध्ये वर्ल्ड टी-20 चॅम्पियन बनवण्याचा चमत्कार त्याने केला. त्यानंतर मात्र या कॅप्टन कूलने मागे वळून पाहिले नाही. आज जगभरात त्याची कॅप्टनशिप नावाजली जाते.

आणि तो प्रयोग यशस्वी झाला

२००७ मध्ये ५० ओव्हरच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाची हालत खराब झाली होती. 'मेन इन ब्लू' पहिल्याच राऊंडमध्ये बाहेर झाले. तेव्हा सीनियर खेळाडूंच्या क्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित झाले. आणि त्याचवेळी बोर्डाने धोनीला कर्णधारपद दिले आणि त्याने त्याचे फळ संपूर्ण भारतीयांना दिले.

यामुळे मिळाले कर्णधारपद

आपल्याला कर्णधारपद का मिळाले, याचा खुलासा माहीने १० वर्षांनंतर केला. धोनी जेव्हा कर्णधार झाला तेव्हा युवराज सिंग, हरभजन सिंग, वीरेंद्र सेहवाग आणि गौतम गंभीर यांसारखे दिग्गज खेळाडू कर्णधारपदाच्या रांगते होते.
कर्णधारपदाचा खुलासा करताना धोनी म्हणाला की, यात सीनियर खेळाडूंची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. याशिवाय क्रिकेटबद्दल असलेला प्रामाणिकपणा आणि समज त्याचबरोबर माझा स्वभाव खूप कामी आला. 

धोनी म्हणतो...

पुढे धोनी म्हणाला की, मला जेव्हा कर्णधार बनवले गेले तेव्हा मी त्या मिटींगमध्ये नव्हतो. पण त्यावेळेस माझ्या सीनियर खेळाडूंनी मला खूप साथ दिली. मला समजले की, माझा प्रामाणिकपणा आणि खेळाबद्दलची समज लक्षात घेऊन मला ही जबाबदारी देण्यात आली आहे. कारण मॅचची परिस्थिती जाणणे खूप महत्त्वाचे असते. सीनियर खेळांडूनीही माझे मत मागितल्यावर मी मोकळेपणाने ते मांडले. त्यामुळे कदाचित टीम इंडियाच्या अन्य खेळाडूंसोबतही माझे चांगले संबंध आहेत.