केपटाऊनमध्ये भुवनेश्वर कुमारचा जलवा!

केपटाऊनमधील न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकन टीमच्या बॅट्समननी सपशेल शरणागती पत्करली. भुवनेश्वरच्या स्विंग माऱ्यासमोर आफ्रिकन बॅट्समनचं काहीच चाललं नाही. 

Updated: Jan 6, 2018, 09:07 AM IST
केपटाऊनमध्ये भुवनेश्वर कुमारचा जलवा! title=

केपटाऊन : केपटाऊनमधील न्यूलँड्सच्या खेळपट्टीवर भुवनेश्वर कुमारच्या बॉलिंगसमोर दक्षिण आफ्रिकन टीमच्या बॅट्समननी सपशेल शरणागती पत्करली. भुवनेश्वरच्या स्विंग माऱ्यासमोर आफ्रिकन बॅट्समनचं काहीच चाललं नाही. 

भुवनेश्वर कुमार टीम इंडियाचा स्विंग किंग.... इन स्विंग आणि आऊट स्विंग करण्यात त्याचा हातखंडा... त्याच्या स्विंगचं उत्तर भल्या-भल्या बॅट्समनना मिळत नाही. आणि दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन टेस्टच्या पहिल्याच दिवशी याचीच प्रचिती आली. आफ्रिकेनं टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. आणि त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला तो भुवनेशवर कुमारनं... त्याच्या तेज-तर्रार माऱ्यासमोर आफ्रिकन बॅट्समनचा निभावा लागला नाही. 

भुवनेश्वर कुमारनं १९ ओव्हर्समध्ये ८७ रन्स देत सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. आपल्या बॉलिंगनं त्यानं आफ्रिकन बॅट्समनना मॅचमध्ये परतण्याची संधीच दिली नाही. 

भुवनेश्वरनं आपल्या पहिल्या तीन ओव्हर्समध्येच आफ्रिकेच्या बॅटिंगला खिंडार पाडलं. त्यानं २०१७ मधील आफ्रिकेचा सर्वाधिक रन्स करणारा बॅट्समन डीन एल्गारला भोपळाही न फोडता पॅव्हेलियनमध्ये पाठवलं. यानंतर दुसऱ्याच ओव्हरमध्ये एडेन मरक्रमलाही आऊट करत त्यानं आफ्रिकेला आणखी एक धक्का दिला. आफ्रिकेला दोन झटके दिल्यानंतर हामिश आमलालाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. क्विंटन डीकॉक या धोकादायक बॅट्समनचा अडसरही भुवीनंच दूर केला. आपल्या प्रभावी माऱ्यानं पहिल्या टेस्टचा पहिला दिवस गाजवला तो मेरठच्या भुवनेश्वर कुमारनं...