टीम इंडियात लवकरच 2 घातक बॉलर्सची एन्ट्री! सौरव गांगुलींचे संकेत

बुमराहच्या टीममध्ये 2 घातक बॉलर्सची एन्ट्री पण कोणाचा पत्ता कट होणार?

Updated: May 17, 2022, 10:57 AM IST
टीम इंडियात लवकरच 2 घातक बॉलर्सची एन्ट्री! सौरव गांगुलींचे संकेत title=

मुंबई : जगातील सर्वात मोठी लीग आयपीएल आहे. या लीगमध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना देशाकडून खेळण्याची संधी मिळते. आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केलेल्या दोन खेळाडूंना टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार आहे. तसे संकेत सौरव गांगुली यांनी दिले आहेत. 

आयपीएल 2022 मध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या दोन खेळाडूंना टीम इंडियातून खेळण्याची संधी मिळणार आहे. टीम इंडियाला आयपीएल संपल्यानंतर 10 दिवसांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळायचा आहे. 9 ते 19 जूनपर्यंत हे सामने खेळवण्यात येणार आहेत. 

टीम इंडियाला इंग्लंड आणि आयर्लंड विरुद्ध सीरिजही खेळायची आहे. 26 जून ते 28 जून आयर्लंड विरुद्ध दोन टी 20 सामन्यांची सीरिज आहे. तर जुलै महिन्यात इंग्लंड विरुद्ध कसोटी सामना खेळायचा आहे. याशिवाय 3 वन डे आणि 3 टी 20 सीरिज देखील खेळायच्या आहेत. 

टीम इंडियाकडून खेळण्याची संधी उमरान मलिक आणि कुलदीप सेनीला मिळू शकते. त्यांना ही संधी मिळाली तर काहीच नवल वाटण्यासारखं नाही असंही सौरव गांगुली म्हणाले आहेत. 

उमरान मलिक 157 किमी ताशी वेगानं बॉल टाकून नवीन रेकॉर्ड केला. कुलदीप सेनही चांगली कामगिरी करतो. आता या दोघांना टीम इंडियात खेळण्याची संधी दिली तर कोणाचा पत्ता कट होणार हे पाहावं लागणार आहे. 

कुलदीप सेन, टी नटराजन, जसप्रीत बुमराह आणि शमी टीम इंडियाकडून खेळण्यासाठी आहेत. त्यामुळे मी खूप खूश असल्याची प्रतिक्रिया सौरव गांगुली यांनी दिली. आता टी नटराजनला टीम इंडियातून खेळण्याची संधी दिली जाणार हे पाहावं लागणार आहे.