IND vs NZ : दुसऱ्या टेस्टसाठीच्या खेळपट्टीवर बीसीसीआयचा निशाणा

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे.

Updated: Feb 27, 2020, 05:26 PM IST
IND vs NZ : दुसऱ्या टेस्टसाठीच्या खेळपट्टीवर बीसीसीआयचा निशाणा title=
फोटो सौजन्य : बीसीसीआय

क्राईस्टचर्च : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या दुसऱ्या टेस्ट मॅचला शनिवार २९ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. क्राईस्टचर्चच्या मैदानामध्ये हा सामना होईल. पण या सामन्याआधीच बीसीसीआयने खेळपट्टीवर निशाणा साधला आहे. 'खेळपट्टी शोधा', असं ट्विट बीसीसीआयने केलं आहे.

बीसीसीआयने ट्विट केलेल्या या फोटोमध्ये खेळपट्टीवर गवत ठेवण्यात आलं आहे. खेळपट्टीवरचं गवत एवढं आहे की खेळपट्टी आणि मैदान यातला फरकही कळत नाहीये. याआधी ट्विट केलेल्या एका फोटोमध्ये बीसीसीआयने या मैदानाचं कौतुकही केलं आहे.

क्राईस्टचर्चच्या या खेळपट्टीवर भारतीय टीम प्रशासन लक्ष ठेवून आहे. पहिली टेस्ट १० विकेटने गमावल्यानंतर आता दुसरी टेस्ट जिंकून सीरिज बरोबरीत सोडवण्याचं आव्हान भारतीय टीमपुढे असणार आहे. खेळपट्टीवर गवत असेल तर याचा फायदा भारतीय बॉलरना होऊ शकतो. त्यामुळे दोन्ही टीमसाठी टॉस जिंकणं महत्त्वाचं ठरणार आहे.