अतिशय वेगात येणारा बॉल खेळाडूने पकडला आणि मोठा अनर्थ टळला

क्रिकेटच्या बॉलमुळे आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. बॉल लागल्यामुळे अनेकांनी आतापर्यंत आपलं जीव गमावले आहेत.

shailesh musale Updated: Mar 14, 2018, 02:35 PM IST
अतिशय वेगात येणारा बॉल खेळाडूने पकडला आणि मोठा अनर्थ टळला title=

मुंबई : क्रिकेटच्या बॉलमुळे आजपर्यंत अनेक घटना घडल्या आहेत. बॉल लागल्यामुळे अनेकांनी आतापर्यंत आपलं जीव गमावले आहेत.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. एका खेळाडूच्या सर्तकतेमुळे रिपोर्टर थोडक्यात वाचली अन्यथा मोठी घटना घडली असती.

बेसबॉलच्या मैदानात एक रिपोर्टर मैदानावर एक बेसबॉल खेळाडूचा इंटरव्यू घेत होती. अचानक एक बॉल त्या रिपोर्टरच्या दिशेने आला पण खेळाडूने तो बॉल न पाहता त्या रिपोर्टरला लागण्याआधी पकडला. काही क्षणात घडलेली ही घटना अंगावर शहारा उभी करणारी आहे.

इंग्लंडचा क्रिकेटर केविन पीटरसनने हा व्हिडिओ त्याच्या ट्विटरवर शेअर केला आहे.

 

No way?!??!

A post shared by Kevin Pietersen (@kp24) on