अखेर रोहितला सूर गवसला, भारतानं बांग्लादेशपुढे ठेवलं एवढं टार्गेट

बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १७६ रन्स केल्या आहेत.

Updated: Mar 14, 2018, 08:46 PM IST
अखेर रोहितला सूर गवसला, भारतानं बांग्लादेशपुढे ठेवलं एवढं टार्गेट title=

कोलंबो : बांग्लादेशविरुद्धच्या टी-20मध्ये भारतानं २० ओव्हरमध्ये ३ विकेट गमावून १७६ रन्स केल्या आहेत. या मॅचमध्ये बांग्लादेशनं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. पण ओपनिंगला आलेल्या रोहित शर्मा आणि शिखर धवननं भारताला चांगली सुरुवात करुन दिली. फॉर्मसाठी झगडणाऱ्या रोहित शर्माला अखेर या मॅचमध्ये सूर गवसला. रोहित शर्मानं ६१ बॉल्समध्ये ८९ रन्सची खेळी केली. तर सुरेश रैनानं ३० बॉल्समध्ये ४७ रन्स केले. शिखर धवन २७ बॉल्समध्ये ३५ रन्स करुन आऊट झाला.

बांग्लादेशकडून रुबेल हुसेनला २ विकेट मिळाल्या, तर रोहित शर्मालाही रुबेलनंच रन आऊट केलं. ही मॅच जिंकून ट्राय सीरिजच्या फायनलमध्ये पोहोचण्याची संधी भारताला आहे. या मॅचमध्ये भारतानं जयदेव उनाडकटऐवजी मोहम्मद सीराजला संधी देण्यात आली आहे. 

लाईव्ह स्कोअर पाहण्यासाठी क्लिक करा