इस्लामाबाद : बाबर आझमच्या (Babar Azam) नेतृत्वात पाकिस्तानने टी 20 वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत धडक मारली. पाकिस्तान दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होता होता राहिला. या संपूर्ण स्पर्धेत न्यूझीलंडचा अपवाद वगळता बाबरला बॅटिंगने विशेष असं काही करता आलं नाही. त्यामुळे बाबरने टी 20 संघाचं कर्णधारपद सोडून बॅटिंगवर लक्ष द्यायला हवं, असं पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी (Shahid Afridi) म्हणालाय. (babar azam step down to t20 format captaincy and focsu on batting says pakistan former captain shahid afridi)
"बाबरने टी 20 कॅप्टन्सी सोडायला हवी. त्याने फक्त बॅटिंगवर लक्ष द्यायला हवं. शादाब, रिझवान आणि शान मसूद कर्णधारपदाची धुरा सांभाळू शकतात. मी बाबरचा सम्मान करतो. त्याची फार इज्जत करतो. तो फार चांगला क्रिकेटर आहे. त्यामुळे बाबर फलंदाजी करताना दबावमुक्त असायला हवा. त्याने टी 20 कॅप्टन्सी सोडून वनडे आणि टेस्टमध्ये नेतृत्व करायला हवं", असा सल्ला आफ्रिदीने दिला. आफ्रिदी एका टीव्ही शोमध्ये बोलत होता. यादरम्यान त्याने बाबरला हा सल्ला दिला.
Shahid Afridi : Babar Azam should quit t20i captaincy and focus on his batting. We have other players who can lead T20i team like Shadab, Rizwan and even Shan. pic.twitter.com/hkZxI3duic
— Thakur (@hassam_sajjad) November 16, 2022
त्यामुळे आता बाबर आझम आफ्रिदीने दिलेल्या सल्ल्याबदद्ल काय प्रतिक्रिया देतो, याकडे क्रिकेट विश्ववाचं लक्ष असणार आहे.
IND vs NZ, 1st T20 : टीम इंडिया-न्यूझीलंड पहिला सामना रद्द होणार?
ENG vs AUS :ऑस्ट्रेलियन खेळाडूची बॉऊन्ड्री लाईनवर अप्रतिम फिल्डींग, VIDEO आला समोर